Post Views : 68
वेब टीम : मुंबई
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्याविरोधात ईडीमध्ये तक्रार दाखल झाली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्या हितसंबंधांसाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप ईडीकडे दिलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे.
पोलीस कर्मचाऱ्यांचे वेतन आधी स्टेट बँक ऑफ इंडियामधून होत होते.
मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत हे व्यवहार एसबीआयकडून काढून घेतले आणि त्यांची पत्नी काम करत असलेल्या अॅक्सिस बँकेकडे हस्तांतरित केले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात संबंधित प्रकरणी तक्रारदाराने जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर 29 ऑगस्ट रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
Related News