banner 728x90

आत्महत्त्येचे सत्र सुरूच.. नाशिक जिल्ह्यात 2 दिवसांत 3 शेतकऱ्यांची आत्महत्या

banner 468x60

Share This:
वेब टीम
मनमाड – नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्त्येचे सत्र सुरू झाले असून नापिकी व डोक्यावर असलेल्या कर्जाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलत 2 दिवसांत 3 शेतकऱ्यांनी आयुष्य संपवले. गुरुवारी (31ऑक्टोबर) एका शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना शुक्रवारी दिंडोरीच्या मोहाडे येथे विष प्रशन करून एकाने आत्महत्त्या केली. मालेगावच्या रोझे येथील भास्कर घुगे या शेतकऱ्याने शोतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यावर बॅंकेचे कर्ज होते शिवाय त्यांनी मुलीच्या विवाहासाठी नातेवाईकांकडून उसणे पैसे घेतले होते. ते कसे फेडायचे या चिंतेतून भास्कर घुगे यांनी आत्महत्त्या केल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.
दरम्यान, राज्यात होत असलेल्या मान्सूनोत्तर पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतात कापणीसाठी आलेले पीक अक्षरशः कुजले आहे. सोयाबिन, बाजरी, ज्वारी, मका पिकाला कोंब फुटले आहेत. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक पाऊसामुळे गमवावे लागले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आर्थिक गणित बसवणे अवघड झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करावी, अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनाचा मोर्चा
दुसरीकडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेवगाव तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. पिकाचे सरसकट तातडीने पंचनामे व्हावेत, हेक्टरी रुपये पन्नास हजार रुपये मदत मिळावी, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीस कोणताही स्वरूपाचा निकष न लावता त्यांच्या खात्यावर रक्कम जमा करावी, तालुक्यातील सर्व महसूल मंडळातील पाऊस मापकावरील पावसाच्या नोंदीची टक्केवारी 75 मिली मीटर पेक्षा जास्त असताना नादुरुस्त पाऊस मापानुसार चुकीची आकडेवारी शासनास कळवून शेतकऱ्यांची फसवणूक करू नये, जास्त लावलेली आणेवारी 50 टक्केच्या आत लावावी, फळबागाची झालेली नुसकान भरपाई देण्यात यावी, या मागण्या यावेळी करण्यात आली. नायब तहसीलदार भानुदास बेरड यांनी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींचे निवेदन स्विकारलेय. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोठी घोषणाबाजी केली व सरकारचा जाहीर निषेध ही केला.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!