IPL Auction 2023: इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) मिनी लिलाव (Mini Auction) हा सर्वाधिक बोली लावणाऱ्या लिलावांपैकी एक ठरला. कारण एका खेळाडूला आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक बोली मिळाली. तो म्हणजे इंग्लडचा वेगवान गोलंदाज सॅम कुरन. या लिलावात यापूर्वीचे अनेक विक्रम मोडले गेले. 29 परदेशी खेळाडूंसह एकूण 80 खेळाडूंची विक्री झाली. बेन स्टोक्स, सॅम कुरन आणि हॅरी ब्रूक हे सर्वाधिक मानधन घेणारे खेळाडू ठरले, म्हणून इंग्लंडच्या खेळाडूंना टी-20 मध्ये विश्वविजेते बनण्याचे फळ मिळाले. या लिलावात काही मजेदार सौदे देखील होते, ज्यामध्ये काही मोठी नावे लिलावात उशिरा आली जसे की रेली रॉसौ, जो रूट आणि शाकिब अल हसन, दरम्यान, आयपीएल 2023 च्या लिलावात विकल्या गेलेल्या 80 खेळाडूंची यादी तुम्ही खाली पाहू शकतात.
सर्व संघांना त्यांच्या संघातील रिक्त जागा भरण्याच्या उद्देशाने प्रभावशाली खेळाडूंसाठी लिलावात चांगली संधी होती. सर्व संघांनी त्यांच्या बेंच डेप्थमध्ये भर घातल्याने संघांनी सुरुवातीपासूनच आक्रमकपणे बोली लावली. काही संघ मोठ्या पर्स घेऊन आले होते. त्यांनी त्यांच्या सर्व लक्ष्यांनुसार बोली लावण्याची खात्री केली. मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स वगळता सर्व संघांनी 25 खेळाडूंचा संपूर्ण स्लॉट भरला.
IPL 2023 मिनी-लिलावात विकल्या गेलेल्या खेळाडूंची यादी
चेन्नई सुपर किंग्ज: बेन स्टोक्स, काईल जेमिसन, निशांत सिंधू, अजिंक्य रहाणे, अजय मंडल, शेख रशीद, भगत वर्मा
दिल्ली कॅपिटल्स: मुकेश कुमार, मनीष पांडे, फिल सॉल्ट, इशांत शर्मा, रिले रोसौ
गुजरात टायटन्स: शिवम मावी, जोशुआ लिटल, केन विल्यमसन, केएस भरत, ओडियन स्मिथ, मोहित शर्मा, उर्विल पटेल
कोलकाता नाईट रायडर्स: डेव्हिड विसे, एन जगदीसन, वैभव अरोरा, सुयश शर्मा, कुलवंत खेजरोलिया, साकिब अल हसन, लिटन दास, मनदीप सिंग
लखनौ सुपर जायंट्स: निकोलस पूरन, डॅनियल सॅम्स, रोमॅरियो शेफर्ड, अमित मिश्रा, जयदेव उनाडकट, यश ठाकूर, स्वप्नील सिंग, प्रेरक मंकड, नवीन-उल-हक, युधवीर चरक
मुंबई इंडियन्स: कॅमेरॉन ग्रीन, झ्ये रिचर्डसन, पियुष चावला, शम्स मुलानी, ड्वेन जॉन्सन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, राघव गोयल
पंजाब किंग्स: सॅम कुरन, सिकंदर रझा, हरप्रीत भाटिया, विद्वत कवेरप्पा, शिवम सिंग, मोहित राठी
राजस्थान रॉयल्स: जेसन होल्डर, डोनोव्हन फरेरा, कुणाल राठौर, अॅडम झम्पा, जो रूट, केएम आसिफ, आकाश वशिष्ठ, अब्दुल पीए, मुरुगन अश्विन
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर: विल जॅक, रीस टोपली, राजन कुमार, अविनाश सिंग, मनोज भंडगे, सोनू यादव, हिमांशू शर्मा
सनरायझर्स हैदराबाद: हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, हेनरिक क्लासेन, विव्रत शर्मा, आदिल रशीद, मयंक डागर, मयंक मार्कंडे, उपेंद्र सिंग यादव, नितीश कुमार रेड्डी, सनवीर सिंग, समर्थ व्यास, अनमोलप्रीत सिंग, अकील हुसेन