मुंबई : एकता कपूरची प्रसिद्ध मालिका ‘कसौटी जिंदगी की’ मध्ये काम करणाऱ्या प्राचीन चौहानला तरुणीची छेड काढल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे सर्वांना मोठ्ठा धक्का बसला आहे.
‘कसौटी जिंदगी की’ फेम प्राचीन चौहानला तरुणीची छेड काढल्याप्रकरणी अटक
मुंबईतील मालाड पोलिसांना चौहान याला अटक केली आहे. तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी प्राचीनवर मालाड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन प्राचीन विरोधात 345, 342, 323, 502 (2) कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतून प्राचीन चौहान याने टीव्ही विश्वात पदार्पण केलं होतं. या मालिकेत त्यानं सुब्रको बसू ही भूमिका साकारली होती. त्यानंतर त्याने ‘कुछ झुकी पलकें, सिंदूर तेरे नाम का, सात फेरे आणि माता पिता के चरणों में स्वर्ग, यासारख्या काही मालिकांमध्ये काम केलं आहे. दरम्यान, काही दिवसांपुर्वी नागिन मालिकेतील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.
Recommendation for You

Post Views : 77 पालघर-योगेश चांदेकर पालघरः पालघर जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या दीव दमण या केंद्रशासित…

Post Views : 77 जव्हार:दिनांक 11 फेब्रुवारी आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमध्ये गेल्या २० वर्षांपासून धुलाई…

Post Views : 77 पालघर-योगेश चांदेकररेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्रसामाजिक कार्यकर्त्याच्या मागणीची दखल पालघरः पालघर शहराचे पश्चिम…













