मुंबई: राजधानी मुंबईतून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. मुंबईतील लोअर परळ परिसरात 15 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) 6 आरोपींना अटक केली आहे. ही घटना 23 डिसेंबरची आहे. पोलिसांनी अटक केलेल्या सहा आरोपींपैकी तीन अल्पवयीन आहेत. अल्पवयीन आरोपींची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. उर्वरित तीन आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला 30 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, तीन अल्पवयीन आरोपींपैकी एक पीडितेचा मित्र असल्याचे सांगण्यात येत आहे. हा मित्र पीडितेला दुसऱ्या मित्राच्या घरी घेऊन गेला. त्याचवेळी सहा आरोपींनी मिळून हा सामूहिक बलात्कार केला. घरी आल्यानंतर भीतीपोटी पीडित तरुणी सुरुवातीला काहीच बोलली नाही. तिला घाबरलेले व शांत पाहून घरच्यांनी तिला विश्वासात घेऊन विचारणा केली असता तिने हा सर्व प्रकार घरच्यांना सांगितला. यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाणे गाठले. पीडितेने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
असे पकडले गेले आरोपी
तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आणि 24 तासांत आरोपींना अटक केली. यानंतर पोलिसांनी तिन्ही आरोपी अल्पवयीन असल्याचे समजले आणि त्यांची बालसुधारगृहात रवानगी केली. उर्वरित आरोपींना मुंबईच्या स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिन्ही आरोपींना 30 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
POCSO अंतर्गत गुन्हा दाखल, पोलीस अधिक तथ्य गोळा करत आहेत
सध्या या प्रकरणाचा पोलीस तपास व चौकशी सुरू आहे. या घटनेशी संबंधित पुरावे गोळा करण्यात येत आहेत. POCSO कायद्यांतर्गत (POCSO- Protection of Children from Sexual Offences) म्हणजेच लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांना संरक्षण देणारा कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा कायदा लैंगिक छळ आणि लैंगिक कृत्यांपासून मुलांचे संरक्षण करण्यासाठी कार्य करतो. या घटनेनंतर पुन्हा एकदा मुंबईतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.