अमरावती : अमरावती लोकसभा मतदार संघाच्या खासदार नवनीत राणा यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले होते. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आज महत्वाचा निर्णय दिला आहे. खासदार राणा यांचा जात प्रमाणपत्र रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने तूर्तास स्थगिती दिली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या या निर्णयाने राणा यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
खोट्या जात प्रमाणपत्र प्रकरणी खासदार नवनीत राणा यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा
शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळा यांनी नवनीत राणा यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र खोटे खोटे असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने हा प्रमाणात रद्द केला होता. या निर्णयामुळे राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आणि रिव्ह्यू याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा अन्यायकारक आहे. दाखल केलेल्या विशेषाधिकार याचिकेअंतर्गत उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे निरीक्षण करण्याची मागणी नवनीत राणा यांनी आपल्या याचिकेत केली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने राणा यांना दिलासा दिला असून, जात प्रमाणपत्र रद्द करण्यावर तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. पुढील सुनावणी आता चार आठवड्या नंतर होणार आहे.
Recommendation for You

Post Views : 76 राज्यातील पालघर जिल्ह्यातील एका औषध (फार्मास्युटिकल) निर्मिती कारखान्यात आज सकाळी भीषण…

Post Views : 76 पालघर-योगेश चांदेकरआमदार राजेंद्र गावित यांनी मांडली होती लक्षवेधी पालघरः पालघर जिल्ह्यातील…

Post Views : 76 पालघर-योगेश चांदेकरखा. डॉ. हेमंत सवरा यांची माहितीअभियानाचा नागरिकांना फायदा होणार पालघरः…

Post Views : 76 पालघर-योगेश चांदेकर तलासरी व डहाणू तालुक्यातील जनता दरबारात तक्रारींचे जागीच निवारण…












