टीम लक्षवेधी :- औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापुर, खुलताबाद तालुक्यातील शेतकऱ्यांनी अनोखे अर्धनग्न आंदोलन करून सर्वांचे लक्ष वेधले . मनसेचे नेते संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. लासूर नाक्यावरील कृषी कार्यालयास टाळे ठोकण्यात आले. आणि अर्ध नग्न होऊन त्यांनी कृषी खात्याच्या गलथान कारभाराचा निषेध केला .
कृषी अधिकाऱ्यांनी पिक विमा मंजूर का केला नाही ? याचे उत्तर आम्हाला द्यावे असे आंदोलन कर्त्यांचे म्हणणे होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी व तहसीलदार यांच्या उत्तराने शेतकऱ्यांचे समाधान झाले नाही. औरंगाबाद जिल्हा कृषी अधिकारी यांनी गंगापुर खुलताबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना यांचे. २०२०-२१ च्या खरीप हंगामातील पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवले . संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांनी या कार्यालयात स्वतः येऊन पिक विमा भरला होता. परंतू पिक विम्याचे पैसे भरूनही लाभ का मिळत नाही ? असा प्रश्न पडलेल्या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयात आंदोलन आणि घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला .
यावेळी संतोष जाधव, जि प. सदस्य मधुकर वालतुरे, प. समिती सदस्य सूमित मुंदडा, बद्रीनाथ बाराहते, अण्णा जाधव, कृष्णा सुकाशे, रवी चव्हाण, कृष्णकांत व्यवहारे, भाऊसाहेब पदार प्रताप पवार, सुदर्शन प्रेमभरे, श्रीमंत चापे, अजीम पठाण, शिवनाथ मालकर, नवनाथ सुराशे सुरेश जाधव हरी राऊत, संदीप पाणकर, सुनिल मुळे आशीर्वाद रोडगे, रामेश्वर मालुसरे अवी जाधव सह इत्यादी शेतकऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी गंगापूर उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित व उपविभागीय अधिकारी व तहसील कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईमुळे पीकविमा मिळाला नाही.कोरोनाचे लोकडाऊन आणि काही ठिकाणी अति वृष्टी ने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला. शेतकऱ्यांनी घरातील सोने नाणे गहाण ठेऊन पीक विम्याचे पैसे भरले होते. मात्र हे पैसे अधिकाऱ्यांच्या नाकर्ते पणामुळे विमा कंपन्यांपर्यंत पोहोचलेच नाहीत आणि त्यामुळे या शेतकऱ्यांना अद्याप विमा मिळाला नाही याचा जाब यावेळी आंदोलन कर्त्यांनी विचारला त्यासाठी त्यांनी अंगावरचे कपडे काढून प्रशासनाचे लक्ष वेधले.
अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक संजय लोहकरे, विलास भुशिंगे, योगेश हरणे, गणेश काथार यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.