banner 728x90

ग्रामपंचायत निवडणुकीविषयी ज्योतिषी संतोष घोलप काय म्हणतात बघा?

banner 468x60

Share This:

 अहमदनगर ः सध्या गावात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. भावकी, पाहुणे, पैसा, राजकीय संबंध असे समीकरण या निवडणुकीसाठी लावले जात आहेत. परंतु सदस्यांची नेमकी काय कर्तव्य असतात. तो काय करू शकतो हे जाणून घेणे गरजेचे आहे. तो काय करू शकतो याची माहिती कितीजणांना आहे, हा संशोधनाचा विषय आहे.

राजकारणापासून नेहमी दूर राहणारे परंतु राजकीय घडामोडींंकडे लक्ष ठेवणारे निंबळकमधील छत्रपती ज्योतिष समूहाचे अध्यक्ष संतोष घोलप यांना सध्या होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रतिऩिधीने त्यांचे मत विचारले असता त्यांनी सांगितले की, कुठलाही उमेदवार जर कार्यक्षम व ग्रामविकासाच्या कामातील सुज्ञ असेल तर तो कुठल्याही पँनलचा असेल तरी तो निवडुन दिल्यास गावच्या विकासाचा वेग प्रचंड  वाढेल! परंतु एखाद्या चांगल्या पँनलचा अकार्यक्षम उमेदवार निवडुन देणं हे गावच्या विकासासाठी अजिबात उपयोगी ठरणार नाही.
असे त्यांनी सांगितले.

banner 325x300

कुठल्याही ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवाराच्या योग्यतेनुसार उमेदवारी न देता उमेदवाराच्या नात्या गोत्याचे गणित मांडून सदर उमेदवाराच्या मागे किती नातेसंबंध व त्यांचे किती मतदान त्याच्या वाँर्डमध्ये आहे, याची आकडेवारी जुळवली जाते. मग उमेदवारी दिली जाते. यात उमेदवार किती शिकलेला, किती हुशार किंवा त्याला विकासकामांच्या सरकारी योजनांची किती जान आहे.

अगदी प्रोसिडींग बुक कशाला म्हटले जाते हे ही माहीत आहे की नाही याचाही विचार न करता उमेदवारी दिली जाते. यामुळे लोकशाहीचा पाया असणारी ग्रामपंचायत विकासकामांच्या योजनांपासुन वंचित राहते.अशी खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली.

दिल्लीत बसणाऱ्या भारतीय संसदेला विकासकामाचे जितके अधिकार आहेत तितकेच अधिकार भारतीय घटनेने गावच्या ग्रामपंचायतला बहाल केलेले आहेत. यावरून आपण ओळखू शकतात. ग्रामपंचायतीकडे किती शक्ती व महत्व आहे. लोकशाहीचा स्तंभ असणाऱ्या दिल्लीतील संसदेने बहुमतात एखादे विधेयक मंजुर केले तर ग्रामपंचायत सदस्य बहुमताने ठराव घेउन ते विधेयक आपल्या गावासाठी नामंजुर करू शकतात. इतके प्रभावी अधिकार जर भारतीय राज्यघटनेने ग्रामपंचायतला बहाल केले आहेत.

हे स्पष्ट आहे की, भारतीय राज्यघटनेने लोकशाही व्यवस्थेत ग्रामपंचायतला संसदेपेक्षा जास्त महत्व दिले आहे, असे घोलप यांनी सांगितले. ग्रामपंचायतमध्ये अत्यंत कुशाग्र बुध्दीचे सरकारी योजनांची जान असणारे व ग्रामपंचायतला थेट दिल्लीतील संसदेला जोडाण्याचा मार्ग माहीत असणारे कार्यक्षम ग्रामपंचायत सदस्य निवडुन देणे किती आवश्यक आहे, हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा असे मत त्यांनी व्यक्त केले!

आपली मुले उच्च शिक्षण घेउन, पुणे, बँगलोरसारख्या इंडस्ट्रीअल झोनमध्ये असणाऱ्या आंतराष्ट्रीय कंपन्यांमध्ये व आयटी क्षेत्रात नोकरी करतात ते इंडस्ट्रीअल झोन कुठल्या न कुठल्या ग्रामपंचायतच्या परीक्षेत्रात उभे आहेत. त्या ग्रामपंचायत क्षेत्रात असे उद्योग येऊ शकतात व टिकुही शकतात तर आपल्याकडे का येऊ  शकत नाही? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.

याचे कारण सांगतांना तिथल्या ग्रामपंचायतीमध्ये निवडुन देण्यात आलेले सदस्य त्या दर्जाचे आहेत. जे दिल्लीच्या व प्रसंगी परदेशी वाऱ्या करून मोठेमोठे उद्योग आपल्या भागात यावेत यासाठी आटोकाट प्रयत्न करतात म्हणून आज बँगलोरचे इंडस्ट्रीअल व आयटी झोन ज्या ग्रामपंचायतींच्या परिक्षेत्रात आहेत, त्या ग्रामपंचायतींची गणना आशिया खंडातील सर्वात प्रभावी ग्रामपंचायतीमध्ये केली जाते. असे उद्योग आपल्या भागात आणायचे असतील! जेणे करून आपली मुले इथेच शिकुन इथेच नोकऱ्या करतील. या कामासाठी त्यांच्या, दर्जाचे सदस्य नि्वडुन देणे गरजेचे आहे. 

आपल्याकडे मोठी साधनसंपत्ती आहे. उद्योगांसाठी आवश्यक असणारा स्वतःचा इंडस्ट्रीअल झोन आपल्याकडे उपलब्ध आहे. उद्योगांच्या दळणवळणासाठी सर्वात महत्वाची समजली जाणारी रेल्वे व हक्काचे रेल्वे स्टेशन आपल्या भागातील अनेक गावांमध्ये आहेत.

शिर्डी विमानतळाला आपल्या भागापर्यंत जोडणारी रेल्वे आपल्याकडे तयार आहे. मुळा धरणाचे प्रचंड पाणी उद्योगांसाठी उपलब्ध आहे. फक्त आपल्याकडे या सर्व साधनसंपत्तीचा वापर करण्याची क्षमता असणारे उमेदवार निवडून देणे आवश्यक आहे.

कुठल्याही उमेदवाराचा पँनल व त्याच्याशी असणारे आपले नातेसंबंध याचा आजिबात विचार न करता उमेदवाराच्या कार्यक्षमतेचा विचार करून मतदान करावे. मग तो उमेदवार आपला व्यक्तीगत शत्रू असेल व जर त्याला  विकासकामांचे पुर्ण ज्ञान असेल तर शत्रूच्या योग्यतेचा पुरेपूर फायदा स्वतःला करून घेण्याची संधी आली असे समजून त्याला निवडुन द्यावे. हा विचार जर मतदारांनी केला तर आपल्या भागाचा विकास होऊ नये असे दिल्लीमधील संसदेने जरी ठरवले तरी विकासापासून ते आपल्याला थांबवू शकत नाहीत, असे मत घोलप यांनी व्यक्त केले!

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!