नवी दिल्ली : हैदराबाद येथील बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपींच्या एन्काउंटरनंतर देशभरातून उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. माजी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी पोलिसांच्या या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे. ‘केवळ तुम्हाला वाटतं म्हणून तुम्ही एखाद्याला कसं मारू शकता?, जे झालं ते खूप भयानक आहे,’ असं त्यांनी म्हटलं आहे.
हैदराबाद बलात्कार प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेले चार आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना, आज सकाळी पोलीस चकमकीत मारले गेले. या वृत्तामुळं सर्वसामान्य लोकांमध्ये आनंद व समाधान व्यक्त होत आहे. बॉलिवूड कलाकारांपासून काही राजकीय नेत्यांनीही याचं स्वागत केलं आहे. भाजपच्या नेत्या व माजी मंत्री मनेका गांधी यांनी मात्र विरोधाचा सूर आळवला आहे.
जे झालं ते देशासाठी भयंकर; एन्काउंटरवर मनेका गांधी नाराज
Recommendation for You

Post Views : 45 संसदेचे पावसाळी अधिवेशन हे राष्ट्रगौरव आणि विजयोत्सवाचे अधिवेशन आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान…

Post Views : 45 स्वच्छता अभियानामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने सुपर स्वच्छ लीग मानांकन मिळविले आहे….