Tunisha Sharma Suicide: सोनी सब टीव्ही मालिका ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ची मुख्य अभिनेत्री तुनिषा शर्माने शनिवारी (24 डिसेंबर) आत्महत्या केली. टीव्ही सीरियलच्या सेटवर तिने गळफास लावून घेतल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच तिला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आत्महत्येचे कारण सध्या तरी समोर आलेले नाही. त्याचबरोबर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तुनिशा फक्त 20 वर्षांची होती. तिने बालकलाकार म्हणून इंडस्ट्रीमध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली आणि ‘भारत का वीर पुत्र महाराणा प्रताप’ या मालिकेतून पदार्पण केले. तुनिषाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी भिवाडी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
तुनिषाची कारकीर्द
मिळालेल्या माहितीनुसार, तुनिषा सध्या सोनी सब टीव्हीवरील ‘अली बाबा: दास्तान ए काबुल’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत होती. या मालिकेत ती शहजादी मरियम बनली होती. याशिवाय ती फितूर, बार बार देखो, कहानी 2: दुर्गा रानी सिंह, दबंग 3 इत्यादी चित्रपटांमध्येही दिसली होती. फितूर आणि बार बार देखो मध्ये तुनिषाने कतरिना कैफची किशोरवयीन भूमिका साकारली होती. याशिवाय ‘इंटरनेट वाला लव’ या मालिकेतील तनिषाच्या भूमिकेला चांगलीच पसंती मिळाली होती.
तुनिषा शर्मा खूप आनंदी स्वभावाची होती आणि ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय होती. सेटवर नेहमीच आनंदी असणा-या तुनिषाच्या अचानक आत्महत्येने चाहते तसेच इंडस्ट्रीतील लोकांना धक्का बसला आहे.