मुंबई : राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता राज्य सरकारने आजपासून पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका लक्षात घेता राज्य सरकारने प्रतिबंधात्मक सूचना आणि नियम जाहीर केले आहेत. त्यानुसार ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत 4 जून 2021 पासून लागू करण्यात आलेल्या निर्बंधात वाढ करण्यात आला आहे.
डेल्टा प्लसचा धोका; राज्यात आजपासून नवे निर्बंध लागू
राज्यातील अनेक जिल्ह्यांचा समावेश दुसऱ्या स्तरातून तिसऱ्या स्तरात करण्यात आला आहे. या ठिकाणी सर्व दुकाने सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत. तर अत्यावश्यक सेवा वगळता इतर वस्तूंचा व्यवहार करणारी दुकानं सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. मॉल्स, सिनेमागृह, मल्टिप्लेक्स बंद राहणार आहेत. रेस्टॉरंट सोमवार ते शुक्रवार 50 टक्के क्षमतेने सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. मुंबईचा समावेश तिसऱ्या स्तरात होत असल्याने लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी बंदच राहणार आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा यापूर्वी प्रमाणे सुरू राहणार आहे.
Recommendation for You

Post Views : 111 पालघर-योगेश चांदेकर पालघरः पालघर जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या दीव दमण या केंद्रशासित…

Post Views : 111 जव्हार:दिनांक 11 फेब्रुवारी आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमध्ये गेल्या २० वर्षांपासून धुलाई…

Post Views : 111 पालघर-योगेश चांदेकररेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्रसामाजिक कार्यकर्त्याच्या मागणीची दखल पालघरः पालघर शहराचे पश्चिम…













