banner 728x90

तहसील कार्यालय परिसरातील कोसळलेले झाड हटविण्याची मागणी वाडा: संजय लांडगे

banner 468x60

Share This:

 

banner 325x300

वाडा तहसीलदार कार्यालयात पुरवठा विभागाच्या बाजूला असलेल्या इमारतीवर याच आवारातील जुने झाड शनिवारी कोसळले आहे. या दुर्घटनेत इमारतीचे नुकसान झाले असून अजूनही हे झाड बाजूला न केल्याने आवारात वावरत असलेल्या लोकांना याचा धोका निर्माण झाला आहे. 

    तहसीलदार कार्यालयाच्या पुरवठा विभागाच्या जुन्या इमारतीवर शनिवारी एक जुने झाड तुटून पडले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने हे झाड तोडून इमारत पुर्वरत करण्याची जबाबदारी घेणे गरजेचे असतांनाही अजूनही हे झाड आहे त्याच अवस्थेत आहे.
     पुरवठा, पोलीस ठाणे, तहसीलदार कार्यालय अशी अनेक महत्वाची कार्यालये या भागात असल्याने येथे येणाऱ्या लोकांना याचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून तातडीने हे झाड बाजूला करण्यात यावे अशी मागणी केली जात आहे. याबाबत निवासी नायब तहसीलदार सुनील लहांगे यांना विचारले असता बांधकाम विभागाला याबाबत कळवले असून लवकरच हे झाड बाजूला हटविले जाईल असे त्यांनी सांगितले.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!