banner 728x90

दही बनवताना लक्षात ठेवा या 3 युक्त्या

banner 468x60

Share This:

 आपण सगळे बाजारातूनच दही विकत आणतो. भारतीय आहारात दह्याचे फार महत्त्व आहे आणि प्रत्येक घरात दह्याचा वापर केला जातो. पण प्रत्येक वेळी बाजारातून दही आणणे चांगले नाही.घरात जरी दही लावतो पण बाजारासारखे दही जमत नाही तक्रार असते की बाजारासारखे दही बनवता येत नाही. आपण देखील बाजारासारखे दही बनवणे इच्छुक आहात तर आज आम्ही आपल्याला तीन प्रकारे दही बनविण्याची पद्धत सांगत आहोत. चला तर मग जाणून घ्या.

1 घट्ट दही बनविण्यासाठी ही युक्ती अवलंबवा –

banner 325x300

घट्ट दही बनविण्याची एक खास युक्ती आहे आणि ती आहे दुधाच्या तापमान कडे लक्ष ठेवणे. या साठी दुधाचे तापमान कोमट पाहिजे. हे जास्त थंड किंवा जास्त गरम नसावे. कोमट तापमानात घट्ट दही बनतं. दूध आणि दही ह्याचे प्रमाण योग्य ठेवावे लागते. जर आपण अर्धा लीटर दुधामध्ये दही बनवत आहेत तर त्यामध्ये एक लहान चमचा दही मिसळा आणि फेणून घ्या, लक्षात ठेवा की या मध्ये जास्त दही मिसळलं तर दही घट्ट होणार नाही ते पातळच राहील. ही युक्ती अवलंबवताना हे लक्षात ठेवा की कोणत्याही हंगामात दही बनवत आहेत तर दुधाच्या व्यतिरिक्त काहीही गरम नसावे. भांडे, दही झाकणारे फडके, चमचा सर्व थंड असावे. एकदा दही जमल्यावर त्याला थोड्या वेळ फ्रीज मध्ये ठेवावे. या मुळे दही अधिक घट्ट होईल.

2 हंग कर्ड बनविण्यासाठी या युक्त्यांचे अनुसरणं करा –

हंग कर्ड बनवताना आपल्याला कपड्याची काळजी घ्यावयाची आहे. आपल्याला हंग कर्ड बनविण्यासाठी थोडं पानचट दही लागेल. ज्या कपड्यामध्ये दही लावायचे आहे ते कापड सुती न घेता मलमली कापड घ्यावे तर या मुळे हंग कर्ड मऊसर आणि क्रिमी बनेल. हंग कर्ड चा वापर दही आणि स्मूदी बनविण्यासाठी केला जातो. या शिवाय केसांसाठी देखील हंग कर्ड चांगले आहे. दह्याचे कबाब बनविण्यासाठी सर्वोत्तम हंग कर्ड आहे. हे बनविण्यासाठी एका उथळ पात्रात चाळणी ठेवा त्याच्या वर मलमली कापड घालून दही घाला. या कपड्याला तसेच पिळून घ्यायचे आहे जसं की पनीर बनविताना पिळतो, पण लक्षात ठेवा की दही खूप मऊ असत म्हणून हळुवार हाताने पिळावे. आता हे 30-40 मिनिटे तसेच राहू द्या जेणे करून त्यामधून पाणी निघून जाईल. आपण कापड्याची ही पिशवी कोठे ही लटकवून ठेवू शकता. नंतर हे 4 -5 तासासाठी फ्रीज मध्ये ठेवून द्या. आपले हंग कर्ड दही तयार आहे.

3 पातळ आणि गोठलेले दही बनविण्यासाठी –

पातळ आणि गोठलेले दही बनविण्यासाठी उलट प्रक्रिया करावयाची आहे. जी आपण घट्ट दही बनविताना केली होती. म्हणजे दुधाचे तापमान थोडं जास्त असावे (येथे जास्त गरम नसावे). अर्धा लीटर दुधाचे दही बनविण्यासाठी दोन मोठे चमचे दही मिसळा. हे पातळ आणि गोठलेले दही लस्सी साठी वापरले जाऊ शकते.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!