नवी दिल्ली : मॉडर्नाची कोरोना लस भारतात मर्यादित आणि तातडीच्या वापरासाठी आयात करण्याची परवानगी सिप्ला या औषध कंपनीला देशाच्या औषध नियंत्रकांनी म्हणजेच डीसीजीआयने दिली आहे. असे निती आयोगाचे सदस्य डॉ.व्ही.के.पॉल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. सिप्ला या मोडर्नाच्या भागीदारी कंपनीकडून अर्ज प्राप्त झाल्यानंतर मॉडर्नाच्या कोरोना लसीला औषध नियंत्रकांनी मर्यादित वापरासाठी मजुरी दिलेली आहे.
देशात कोरोनावरील चौथ्या लसीच्या आयातीस डीसीजीआयची मंजुरी
डॉ.पॉल म्हणाले की, मॉडर्नाला साथ महिन्यापर्यंत उणे 15 ते 25 अंश तापमानावर ठेवले जाऊ शकते. 30 दिवसांपर्यंत या लसीला 2 ते 8 अंश तापमानावर ठेवले जाऊ शकते.इतर लसीप्रमाणे 28 दिवसांनंतर तिची दुसरी मात्रा देता येते.
गर्भवती महिलांना लवकरच लस
आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, गर्भवती महिलांनाही कोरोना लसीपासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही. विशेषज्ञ समितीने गर्भवती महिलांना कोरोना लस घेण्यास परवानगी दिली आहे. लवकरच मार्गदर्शक सूचना दिला जातील.
देशातील 111 जिल्ह्यात धोका कायम
देशातील 111 जिल्ह्यात रोज 100 पेक्षा जास्त कोरोनाचे नवे रुग्ण आढळत आहे. हा चिंतेचा विषय असून कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये आजही कोरोनाचा धोका कायम आहे.
Recommendation for You

Post Views : 78 राज्यातील पालघर जिल्ह्यातील एका औषध (फार्मास्युटिकल) निर्मिती कारखान्यात आज सकाळी भीषण…

Post Views : 78 पालघर-योगेश चांदेकरआमदार राजेंद्र गावित यांनी मांडली होती लक्षवेधी पालघरः पालघर जिल्ह्यातील…

Post Views : 78 पालघर-योगेश चांदेकरखा. डॉ. हेमंत सवरा यांची माहितीअभियानाचा नागरिकांना फायदा होणार पालघरः…

Post Views : 78 पालघर-योगेश चांदेकर तलासरी व डहाणू तालुक्यातील जनता दरबारात तक्रारींचे जागीच निवारण…












