banner 728x90

नगर जिल्ह्यात पुन्हा खळबळ, चारजण कोरोनाबाधित

banner 468x60

Share This:


हमदनगर : –  बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या ०४ जणांना कोरोणाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून या व्यक्ती मुंबई, उल्हासनगर, तुर्भे, औरंगाबाद आदी ठिकाणाहून जिल्ह्यात आल्या होत्या. तसेच संगमनेर तालुक्यातील निमोण येथील एका कोरोना बाधीत रुग्णाचा काल रात्री नाशिक येथे मृत्यू झाला.
त्यामुळे कोरोनामुळे जिल्ह्यात मृत्यू पावलेल्यांची संख्या आता ०७ झाली आहे. जिल्ह्यातील बाधीत रुग्णांची संख्या ७४ असून जिल्ह्याबाहेरील बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. दरम्यान, घाटकोपर येथील महिलेचा रिपीट अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. इतर १४ अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज सकाळी येथील  जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅब मध्ये १९ व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने तपासण्यात आले. त्यात या व्यक्ती बाधीत आढळून आल्या. यातील एक २६ वर्षीय व्यक्ती १७ मे रोजी मुंबईहून राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे आली होती. दुसरी ६० वर्षीय बाधीतव्यक्ती तुर्भे, मुंबई येथून२२ मे रोजी कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथे आली होती. तिसरी ३२ वर्षीय बाधीत व्यक्ती औरंगाबाद येथून २० मे रोजी श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथे आली होती. नेवासा बु. येथे २२ मे रोजी उल्हासनगर येथून आलेल्या ६० वर्षीय महिलाही बाधीत आढळून आली आहे. याशिवाय, काही दिवसापूर्वी बाधीत आढळलेल्या घाटकोपर येथील महिलेचा दुसरा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

banner 325x300

दरम्यान, नाशिक येथे उपचार घेत असलेल्या संगमनेर तालुक्यातील निमोन येथील एका रुग्णाचा काल रात्री मृत्यू झाला.नाशिक येथे कार्यरत असलेल्या पोलिस कॉन्स्टेबलचे  ते वडील आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ.बापूसाहेब गाढे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली. **

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!