banner 728x90

पाकिस्तानला जाणारं पाणी रोखणार – नरेंद्र मोदी

banner 468x60

Share This:

वेब टीम 
हरियाणा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला जाणारं पाणी रोखणार असल्याचं म्हटलं आहे. हरियाणामधील प्रचारसभेत बोलताना त्यांनी हे आश्वासन दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये प्रचारसभा घेण्यात व्यस्त आहेत. हरियाणामधील प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला जाणारं पाणी रोखून, ते पाणी हरियाणाकडे वळवणार असल्याचं सांगितलं.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३७० कलमबद्दल खोट्या अफवा पसरवणाऱ्या काँग्रेसला आगामी विधानसभा निवडणुकीत धडा शिकवण्याचं आवाहनही केलं. “जम्मू काश्मीरमधून ३७० कलम हटवण्यात आल्यानंतर काँग्रेसकडून खोट्या अफवा पसरवल्या जात आहेत. त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत चांगला धडा शिकवा,” असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
“जम्मू काश्मीरमधून ३७० कलम हटवण्याचा निर्णय राष्ट्रहितासाठी घेण्यात आला,” असं यावेळी नरेंद्र मोदींनी सांगितलं. यावेळी बोलताना नरेंद्र मोदींनी आश्वासन देत, ‘आपलं सरकार पाकिस्तानला जाणारं पाणी रोखणार आणि तेच पाणी हरियाणाकडे वळवणार. हे आपल्या देशाचं आणि राज्यातील शेतकऱ्याचं हक्काचं पाणी आहे,” असं सांगितलं.
“गेली ७० वर्ष जे हरियाणामधील शेतकरी आणि आपल्या हक्काचं जे आहे ते पाकिस्तानला मिळत आहे. पण हा मोदी हे पाणी रोखणार आणि तुमच्या घरापर्यंत आणणार. मी आधीच यादृष्टीने काम करण्यास सुरुवात केली आहे. हे पाणी आपला देश आणि हरियाणामधील शेतकऱ्यांच्या हक्काचं आहे. यामुळेच मोदी तुमच्यासाठी लढत आहे,”.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!