मुंबई : पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदी याला अखेर परागंदा आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आले. विशेष पीएमएलए न्यायालयानं आज हा निर्णय दिला. पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) नीरव मोदीविरोधात विशेष पीएमएलए न्यायालयात खटला दाखल केला आहे. वारंवार समन्स बजावूनही नीरव न्यायालयीन कार्यवाहीला सामोरा जात नसल्याने त्याला नव्या कायद्यान्वये ‘परागंदा आर्थिक गुन्हेगार’ घोषित करावे, अशी विनंती ईडीनं अर्जाद्वारे केली होती. ईडीचा अर्ज मान्य करतानाच, न्यायालयानं नीरव मोदीला परागंदा आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केलं. आता न्यायालयाच्या परवानगीनं ईडीद्वारे मोदीची संपत्ती जप्त करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे.
१७ हजार ९०० कोटींचा घोटाळा; ५१ घोटाळेबाज पसार
दरम्यान, १५ जानेवारीपर्यंत न्यायालयात हजर व्हा, अन्यथा तुम्हाला फरार म्हणून घोषित केले जाईल, असा इशारा देणारी नोटीस बुधवारी विशेष सीबीआय न्यायालयाने मुख्य आरोपी नीरव मोदी तसेच त्याचा भाऊ निशाल मोदी व निकटवर्तीय सुभाष परब यांना जारी केली होती. या तारखेपर्यंत हे तिघे न्यायालयात हजर झाले नाही तर त्यांना फरार घोषित केले जाईल आणि त्यानंतर त्यांची देशातील संपत्ती जप्त करण्याचे अधिकार सीबीआयला मिळणार आहेत.
.
पीएनबी घोटाळा: नीरव मोदी अखेर फरार घोषित
Recommendation for You

भारताच्या लॉजिस्टिक्स क्रांतीला गती; नवी मुंबई विमानतळावर फेडेक्सचे 2,500 कोटींचे भव्य एअर कार्गो हब
Post Views : 76 भारतीय अर्थव्यवस्थेच्या वेगाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी लॉजिस्टिक्स क्षेत्र कणा मानले जाते….

Post Views : 76 वैद्यकीय कारणास्तव अनुपस्थित विद्यार्थ्यांसाठी संधी’कॉपीमुक्त अभियान’ची कडक अंमलबजावणीतणावमुक्त परीक्षा अन् समुपदेशन…

Post Views : 76 लोकभवन येथील कॉन्फरन्स सभागृहात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या…

Post Views : 76 भूजल व्यवस्थापनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची अटल भूजल योजना प्रभावी ठरली होती….













