मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आणि शिवसेनेच्या युतीवर मोठे विधान केले आहे. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. याच दरम्यान फडणवीसांना भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, भाजप आणि सत्ताधारी शिवसेनेत काही मुद्द्यांवरुन मतभेद आहेत. परिस्थितीनुसार निर्णय घेतले जातात.
भाजप-शिवसेनेत काही मतभेद असतील, पण आम्ही शत्रू नाहीत; फडणवीसांचे वक्तव्य
शिवसेनेसोबत काही मतभेद असतील पण आम्ही शत्रू नाही, असे फडणवीस म्हणाले. आम्ही (शिवसेना आणि भाजप) कधीच शत्रू नव्हतो. दरम्यान, यावेळी त्यांनी शिवसेनेशी युती होण्याची शक्यता ही नाकारली नाही. राज्यातील प्रश्नांपासून पळ काढण्यासाठी सरकार अधिवेशनाचा काळ कमी करत असून, यंदाचे अधिवेशन दोनच दिवसात गुंडाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकार लोकशाहीला कुलूप लावण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका करताना सभागृहात बोलू दिलं नाही, तर आम्ही माध्यमांसमोर, रस्त्यावर येऊन आणि जनतेत जाऊन आमचं म्हणणं मांडू अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे.
Recommendation for You

Post Views : 69 राज्यातील पालघर जिल्ह्यातील एका औषध (फार्मास्युटिकल) निर्मिती कारखान्यात आज सकाळी भीषण…

Post Views : 69 पालघर-योगेश चांदेकरआमदार राजेंद्र गावित यांनी मांडली होती लक्षवेधी पालघरः पालघर जिल्ह्यातील…

Post Views : 69 पालघर-योगेश चांदेकरखा. डॉ. हेमंत सवरा यांची माहितीअभियानाचा नागरिकांना फायदा होणार पालघरः…

Post Views : 69 पालघर-योगेश चांदेकर तलासरी व डहाणू तालुक्यातील जनता दरबारात तक्रारींचे जागीच निवारण…












