औरंगाबाद (प्रतिनिधी) : मराठा आंदोलनाची पुढील भूमिका ठरवण्यासाठी संभाजीराजे यांनी कोपर्डीनंतर मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदु राहिलेल्या गंगापूर तालुक्यातील कायगाव टोका येथील काकासाहेब शिंदे यांच्या स्मारकाला अभिवादन केले. त्यांनतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. राज्यकर्त्यांनी मराठा आरक्षणासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावे. पुन्हा आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ देऊ नये. असे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रपती नियुक्त सदस्य आहे.पण राजकारणविरहित मराठा आरक्षणाचा लढा लढवून न्याय मिळवून देण्याची माझी भूमिका आहे. आरक्षणाबद्दल मराठा समाजाने आपली भूमिका मांडली असून आता लोकप्रतिनिधींनी याची जबाबदारी घ्यावी असे संभाजीराजे म्हणाले…