banner 728x90

राज्यात सद्यस्थितीत सत्तासमीकरणाच्या ‘या’ ६ शक्यता

banner 468x60

Share This:

वेब टीम
मुंबई – राज्यात कुणाची सत्ता येणार ? भाजपासमोर काय आहेत पर्याय ? शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणार ? नव्या सरकारमध्ये अपक्षांना किती महत्त्व राहील ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सध्या राज्यात सगळेच जण शोधतायेत. निकालाला आठ दिवस उलटून गेले तरी भाजपा आणि शिवसेनेत अजून चर्चाच सुरु झालेली नाही. कालपर्यंत थोडी समन्वयाच्या भूमिकेत असलेल्या शिवसेनेनं आता थेट भाजपाला आव्हान दिलंय. तर दुसरीकडे ५ किंवा ६ तारखेला फडणवीस सरकारचा शपथविधी करण्याची तयारी भाजपाच्या गोटात सुरु झाली आहे. त्यामुळे सत्ता समिकरणाच्या ६ शक्यता वर्तवल्या जात आहेत. 
शक्यता क्रमांक 1 
अमित शाह यांच्या मुंबई भेटीनंतर शिवसेना आणि भाजपातील तणाव निवळेल
शक्यता क्रमांक २ 
सध्या १३ अपक्ष भाजपाच्या साथीला आहेत, तर ६ अपक्ष शिवसेनेकडे आहेत. सर्व अपक्ष एकत्र आले तरी भाजपा बहुमताच्या आकड्यापासून दूर 
शक्यता क्रमांक ३ 
शिवसेनेतील आमदारांना फोडून भाजपा सत्ता स्थापन करेल. पण दोन तृतियांश आमदार फोडणे भाजपासाठी अवघड आहे. त्यामुळे शिवसेनेचे आमदार राजीनामा देण्याची शक्यता. 
शक्यता क्रमांक ४
शपथविधीनंतर राष्ट्रवादीचा बाहेरुन पाठिंबा किंवा तटस्थ राहण्याची भूमिका… त्यासाठी भाजपश्रेष्ठींकडून राष्ट्रवादीशी चर्चा
शक्यता क्रमांक ५
हिवाळी अधिवेशनात बहुमत सिद्ध करता आले नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता 
शक्यता क्रमांक ६ 
हे सगळं करुनही भाजपाकडून सत्ता स्थापन होऊ शकली नाही तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येवून सत्ता स्थापण्याची ही शक्यता आहे. यात काँग्रेस तटस्थ राहणार की बाहेरुन पाठिंबा देणार हेही महत्त्वाचे ठरणार आहे. 
त्यामुळे नव्या सरकारमध्ये अपक्षांना कमी पण बाकीच्या पक्षातील आमदारांना विशेष महत्त्व येईल, असं सध्यातरी म्हणायला हरकत नाही. त्यामुळे येते काही दिवस घोडेबाजाराचे ठरणार का ? आणि महानिकालानंतर आता सत्तास्थापनेचं महानाट्य रंगणार का ? हे पाहावं लागणार आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!