banner 728x90

विधानभवन पायऱ्यांवर कम्युनिस्ट पक्षाचे आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांची जोरदार घोषणाबाजी

banner 468x60

Share This:


नागपूर / डहाणू, (प्रतिनिधी):
हिवाळी अधिवेशनात विधानभवन पायऱ्यांवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 128 डहाणू (अ.ज.) विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले (Vinod Nikolay) यांच्या सह काही आमदारांनी ‘बोगस हटाव, आदिवासी बचाव’ अश्या जोरदार घोषणा फलक झळकावून दिल्या. यावेळी आमदार कॉ. निकोले म्हणाले की, राज्य सरकारने बोगस आदिवासींना अधिसंख्या पदांवर संरक्षण देण्याचा जो निर्णय घेतला आहे हा आदिवासी समाजावर अन्यायकारक असून असंविधानिक आहे. आपल्या देशाची सर्वेसर्वा न्याय व्यवस्था सर्वोच्च न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत की, जे काही बोगस आदिवासींनी  नोकऱ्यांमध्ये जागा बळकावल्या आहेत. ही पदे त्वरित रिक्त करून जो मूळ आदिवासी आहे त्यांना या पदांवर सामावून घेतले पाहिजे. पण, या सरकारने त्या निर्णयाचा अपमान केला असून बोगस आदिवासींना संरक्षण दिले आहे. 

banner 325x300

संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामीण भागात अनेक शिक्षित, उच्च शिक्षित तरुण या नोकरीची वाट बघतोय. दिवसेंदिवस त्या तरुणांचे वय वाढत जात आहे. आणि आज या तरुणांना कुठेतरी रोजंदारीवर काम करावे लागत आहे तर याच तरुणांचे आई वडिल शेतात काम करून अर्ध पोटी राहून आपल्या मुलांना शिक्षण दिल आहे. जेणेकरून उद्या आपले चांगले दिवस येतील. अश्या प्रकारची स्वप्न जे आई वडील बघत आहेत परंतु आज या सरकारच्या केवळ एका निर्णयामुळे त्यांची स्वप्न अपूर्ण राहत आहेत. आणि हा जो आदिवासी तरुण बेरोजगार असल्याचे तो रोजंदारीवर कामाला जातोय.

दरम्यान आम्ही सर्व आदिवासी आमदार एकत्र आले आहोत. त्यावर आमचं असं म्हणण आहे की, आम्ही या सरकारला इशारा देतो की त्वरित हा जो निर्णय घेतला आहे तो मागे घेऊन बोगस आदिवासींचे पदे रिक्त करून जे खरे मूळ आदिवासी आहेत त्याची नियुक्ती झाली पाहिजे अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा सबंध आदिवासी जो या देशाचा मूळ आदिवासी आहे हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आम्ही देतो असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 128 डहाणू (अ.ज.) विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी सांगितले. याप्रसंगी आमदार राजेश पाटील, आ. सुनील भूसारा, आ. दौलत दरोडा, आ. हिरामण खोसकर, आ. डॉ. किरण लहामटे, आ. धर्मरावबाबा आत्राम, आ. नितीन पवार, आ. सहसराम कोरोटे आदी उपस्थित होते.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!