Manipur Bus Accident: स्कूल बसच्या अपघातात (Bus Accident) अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची बातमी मणिपूरच्या नोनी जिल्ह्यातून समोर आली आहे. येथे विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या दोन स्कूल बस अनियंत्रित होऊन उलटल्या. या अपघातात 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात विद्यार्थीही जखमी झाले आहेत. नोली जिल्ह्यातील बिष्णुपूर खैपूर रोडवर हा अपघात झाला. विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या दोन्ही बस थंबलानू उच्च माध्यमिक विद्यालयाच्या असल्याचं सांगितलं जात आहे. त्या वेळी अभ्यास दौऱ्यासाठी खोपूमला जात होत्या.
मुख्यमंत्र्यांनी अपघातावर शोक केले व्यक्त
या अपघातात अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचाही संशय आहे. जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी इंफाळ येथील मेडिसिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत 20 हून अधिक विद्यार्थी येथे आले आहेत. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, आज जुना काचार रोडवर स्कूल बसेसचा अपघात झाल्याचे ऐकून खूप वाईट वाटले. या अपघातानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. SDRF, वैद्यकीय पथक घटनास्थळी पोहोचले आहे. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी मी देवाकडे प्रार्थना करतो.
चालकाचे सुटले नियंत्रण
चालकाचे अचानक नियंत्रण सुटल्याने एवढा मोठा बस अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. थंबलानू उच्च माध्यमिक विद्यालयाच्या दोन बसेस विद्यार्थ्यांना घेऊन अभ्यास दौऱ्यावर जात होत्या. विद्यार्थिनी ज्या बसमध्ये प्रवास करत होत्या त्या बसच्या चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले, त्यानंतर बस उलटून अपघात झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या बसमुळे इतर बसचाही अपघात झाला.




.jpg)













