गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या तोक्ते चक्रीवादळामुळे पालघर जिह्यात प्रचंड नुकसान झाले होते. त्यावेळेस महाराष्ट्राचे नगरविकास तसेच सार्वजनिक( उपक्रम ) मंत्री यांनी पालघर जिह्याचा दौरा करून नुकसान झालेल्या कुटुंबांना सहकार्य केले होते व ज्यांच्या घराचे छप्पर उडाले होते त्यांनाही पत्रे देऊन सहकार्य करण्याचा प्रयत्न केला .
ह्या सर्व प्रसंगातून काही कुटुंब सावरली तर ज्यांची परिस्थिती बेताची आहे ते अजूनही सावरले नाहीत अशाच पालघर तालुक्यातील नवापूर गावातील मेहेर नाका येथील एका गरीब आदिवासी कुटुंबाचे संपूर्ण घरच ह्या चक्रीवादळामुळे उध्वस्त झाले त्यांना शिवसेनेच्या वतीने सहकार्य ही झाले परंतु संपूर्ण घराचेच नुकसान झाल्याने पत्रे अपुरे पडले यातच पावसाळा तोंडावर असल्याने त्यांची चिंता वाढली अशा वेळी नवापूर गावचे शिवसेना शाखाप्रमुख नितीन पागधरे यांनी शिवसेनेचे कुंदन संखे यांना संपर्क करून ह्या कुटुंबाला सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली असता लगेचच श्री. कुंदन संखे यांनी त्वरित पत्रे पाठवून दिले.
एका गरीब कुटुंबाला लगेचच आधार मिळाल्याने त्यांनी शिवसेनेचे व श्री. कुंदन संखे यांचे आभार मानले.