RRR Movie: 24 मार्च 2022 रोजी रिलीज होणारा, ‘आरआरआर’ (RRR) 1920 च्या दशकातील अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम या दोन भारतीय क्रांतिकारकांवर आधारित आहे. राजामौली यांचा चित्रपट तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अजय देवगण (Ajay Devgan) यांनी कॅमिओ केला आहे. या चित्रपटाने संपूर्ण भारतात ब्लॉकबस्टर कमाई केली होती. आता अटलांटा फिल्म क्रिटिक्स सर्कलतर्फे ‘आरआरआर’ला ‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्र’ म्हणून गौरविण्यात आले आहे. तसेच ‘सॅटर्न अवॉर्ड्स 2022’ मध्ये ‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट’ पुरस्कारही जिंकला आहे. तसेच त्यांनी फिलाडेल्फिया फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘नॅरेटिव्ह ऑडियन्स अवॉर्ड’ही जिंकला. यासाठी न्यूयॉर्क फिल्म क्रिटिक्स सर्कलतर्फे एसएस राजामौली यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 1,000 कोटी क्लबमध्ये सामील होणारा ‘आरआरआर’ हा तिसरा भारतीय चित्रपट आहे.
एसएस राजामौली यांच्यासाठी हे वर्ष खूप चांगले गेले, राजामौली यांचा ‘आरआरआर’ चित्रपट आपल्या यशाचा नवा इतिहास रचत आहे. या चित्रपटाने अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत. त्याच वेळी, आता या वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये देखील त्याची गणना केली जात आहे. ज्युनियर एनटीआर आणि राम चरण स्टारर ‘आरआरआर’ ने आता वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या जागतिक यादीत प्रवेश केला आहे. या यादीत ‘आरआरआर’ने टॉम क्रूझच्या ‘टॉप गन: मॅवेरिक’ला मागे टाकले आहे.
ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूटच्या साईट अँड साउंड मासिकाने 2022 च्या 50 सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये ‘आरआरआर’ चित्रपटाचा समावेश केला आहे. एसएस राजामौली यांच्या या ऐतिहासिक कथेने या यादीत नववे स्थान मिळवले आहे. दुसरीकडे, टॉम क्रूझच्या ‘टॉप गन: मॅवेरिक’ला या यादीत 38 वे स्थान मिळाले आहे. शौनक सेन यांच्या ‘ऑल द ब्रीड्स’ या माहितीपटाचाही या यादीत समावेश आहे. ‘ऑल दॅट ब्रीड्स’ने 32 वे स्थान पटकावले. शार्लोट वेल्सच्या दिग्दर्शनातील पदार्पण ‘आफ्टर सन’ या चित्रपटाला या यादीत पहिले स्थान मिळाले आहे. हा चित्रपट वडील आणि मुलीच्या नात्यावर आधारित आहे.