वेब टीम
उस्मानाबाद – उस्मानाबादचे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर एका तरुणाने चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीय. कळंब तालुक्यात पडोळीमधील नायगाव येथे हा हल्ला झाला. या हल्ल्यात ओमराजेंना कुठलीही दुखापत झालेली नाही. ते सुखरुप आहेत. शिवसेनेचे उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारासाठी ते गावात रस्त्यावरून चालत होते. त्यावेळी हा प्रकार घडला. दरम्यान, पळून गेलेल्या हल्लेखोर तरुणाला पोलिसांनी अटक केली.
ओमराजे निंबाळकर हे पडोळी नायगाव येथे प्रचार करत होते. यावेळी गर्दीतून आलेल्या एका तरुणाने हात मिळवत त्यांच्या पोटावर दुसऱ्या हाताने चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. पण ओमराजे यांनी दुसरा हात मध्ये घालत हा चाकू हल्ला अडवला. यानंतर हल्ला करणारा तरुण पळून गेला. ओमराजेंच्या घड्याळावर चाकूचा वार बसल्याने त्यांना कुठलीही दुखापत झाली नाही. ते सुखरूप आहेत. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झालेत.
हल्ला करणारा तरुण हा कोण होता हे माहिती नाही. या घटनेने आपल्यालाही धक्का बसला आहे. आपल्या वडिलांचीही अशाच प्रकारे हत्या झालीय. मात्र आपल्यावर झालेल्या हल्ल्याची ही पहिलीच घटना आहे. मी सुखरुप आहे. पण हा हल्ला कशामुळे केला गेला. यामागे कोण आहे. याची आपल्याला कल्पना नाही. गेल्या दोन दिवसांपासून प्रचारासाठी फिरतोय. काही प्रचारसंभांमध्ये जाणूनबुजून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला गेला, असं खासदार ओमराजे निंबाळकर यांनी हल्ल्यांच्या घटनेनंतर सांगितलं.
सेनेच्या ओमराजे निंबाळकरांवर चाकू हल्ला करणाऱ्याला अटक
Recommendation for You

Post Views : 108 पालघर- वसई-विरार चे प्रथम महापौर, ज्येष्ठ समाजसेवक, उद्योजक, ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक…

Post Views : 108 पालघर-योगेश चांदेकर पालघरः पालघर जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष…

Post Views : 108 पालघर-योगेश चांदेकर पालघरः डहाणू नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि २७ नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी भारतीय…

Post Views : 108 जिल्ह्यात सुरू असलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पालघर…













