मुंबई : आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव लवकर घटस्फोट घेणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून या दोघांनी याची माहिती दिली आहे. आमिर खान आणि किरण राव यांनी लग्नाच्या 15 वर्षांनंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतल्यानं आता त्यांच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे. किरण रावनं करण जोहरचा लोकप्रिय शो ‘कॉफी विथ करण’मध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानबाबत हा खुलासा केला होता. या शोमध्ये बोलताना ती म्हणाली होती, ‘आमिरच्या आयुष्यात स्वतःसाठी जागा तयार करणं हे माझ्यासाठी खूप मोठं आव्हान होतं. कारण त्यावेळी त्याचा पहिली पत्नी रिना दत्तासोबत घटस्फोट झाला होता. तो कठीण काळातून जात होता. आमिरसारख्या पतीसोबत राहणं खूपच कठीण आहे कारण त्याला पार्ट्या करणं किंवा पार्ट्यांना हजेरी लावणं अजिबात आवडत नाही. मोठ्या आवजात गाणी ऐकणं त्याला आवडत नाही. यामुळे लोकांना वाटतं की तो एक गंभीर स्वभाव असलेला व्यक्ती आहे. पण असं नाही आहे. तो स्वतःमध्ये रमणारा व्यक्ती आहे.’
15 वर्षाच्या सुखी संसारानंतर आमीर खान आणि किरण राव यांचा वेगळं होण्याचा निर्णय
आमिर आणि किरण यांच्या लग्नानंतर काही वर्षांनी दोघांमध्ये मतभेद होऊ लागले होते. किरणनं रागाच्या भरात आमिरला चांगलंच सुनावलं होतं. याचा उल्लेख आमिरनं एका मुलाखतीत केला होता. किरण त्याला म्हणाली होती, ‘वास्तवात तुला आमची अजिबात काळजी नाहीये. मला वाटतं आम्ही तुझ्यासाठी नाहीच आहोत. तुझ्या आयुष्यात आम्हाला जागाच नाही आहे. आम्ही तुझ्यासोबत असलो तरीही तुझं मन मात्र कुठेतरी दुसरीकडेच गुंतलेलं आहे. मला माहीत आहे की, तुझं माझ्यावर प्रेम आहे. पण मला याचा विश्वास नाहीये आणि जर मी तुला बदलण्याचा प्रयत्न केला तर ते योग्य होणार नाही कारण तेव्हा तू ती व्यक्ती राहणार नाहीस ज्याच्या मी प्रेमात पडले होते.’ किरणच्या अशा बोलण्यानं आमिरचं आयुष्य खूपच बदलून गेलं होतं असं त्यानं या मुलाखतीत सांगितलं होतं.
आमिर खानचे पाहिले लग्न रिना दत्ता हिच्याशी झालं होतं. ‘कयामत से कयामत तक’ सिनेमाचं शूटिंग सुरू असताना आमिरने रिनाशी लग्न केलं होतं. 18 एप्रिल 1986 रोजी केलेलं हे लग्न जवळपास 16 वर्ष चाललं. 2002 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर आमिरनं 28 डिसेंबर 2005 रोजी किरण रावशी लग्न केलं होतं.
Recommendation for You

Post Views : 83 राज्यातील पालघर जिल्ह्यातील एका औषध (फार्मास्युटिकल) निर्मिती कारखान्यात आज सकाळी भीषण…

Post Views : 83 पालघर-योगेश चांदेकरआमदार राजेंद्र गावित यांनी मांडली होती लक्षवेधी पालघरः पालघर जिल्ह्यातील…

Post Views : 83 पालघर-योगेश चांदेकरखा. डॉ. हेमंत सवरा यांची माहितीअभियानाचा नागरिकांना फायदा होणार पालघरः…

Post Views : 83 पालघर-योगेश चांदेकर तलासरी व डहाणू तालुक्यातील जनता दरबारात तक्रारींचे जागीच निवारण…












