मुंबईमध्ये 11 जुलैला 2006 मध्ये लोकलमध्ये तसेच रेल्वे स्टेशन परिसरात स्फोट झाले होते. या साखळी बाॅम्बस्फोटमुळे मुंबईसह महाराष्ट्र हादरला होता. या बाॅम्बस्फोट तब्बल 209 जणांचा मृत्यू झाला होता तर 700 जण जखमी झाले होते.
या प्रकरणात तब्बल 12 जणांना सत्र न्यायालयाने दोषी ठरवले. पाच जणांना फाशीची तर सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबावर आरोपी हायकोर्टात गेले होते. मुंबई हायकोर्टात या केसचा आज (सोमवारी) निकाल जाहीर झाला. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती एस चांडक यांच्या खंडपीठाने निकाल देताना साखळी बाॅम्बस्फोटमधील 12 आरोपींना निर्दोष मुक्तता केली. पुराव्यांच्या अभावामुळे आरोपींना निर्दोष मुक्तता करण्यात आली. दरम्यान, 12 आरोपींपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे 11 आरोपींची तुरुंगातून सुटका होणार आहे.
11 जुलै 2006 मध्ये मुंबईच्या उपनगरीय माटुंगा रोड , माहिम जंक्शन , वांद्रे , खार रोड , जोगेश्वरी , भाईंदर आणि बोरिवली येथे अवघ्या 11 मिनिटांमध्ये बॉम्बस्फोट झाले होते. पोलिसांनी बॉम्बस्फोटात सहभागी असल्याच्या संशयावरून तीन जणांना अटक केली. ताब्यात घेतेले संशयीत हे बंदी असलेल्या सिमी संघटनेशी संबंधित असल्याचे त्यावेळी पुढे आले होते.
सरकारला सुप्रीम कोर्टात जाणार?
विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी आरोपींना निर्दोष सोडण्याच्या निकालावर बोलताना सांगितले की, सरकारला पुन्हा निकालचा चाचपणी करून सुप्रीम कोर्टात अपिल दाखल करावे लागेल. जर सुनावनीत शिक्षेवर स्टे मागितला असेल तर आरोपी लगेच तुरुंगाबाहेर येणार नाहीत. सरकारला निकालपत्राचे मुल्यमापण करावे लागले.
न्यायालयाने नोंदवलेले आक्षेप
– साक्षीदारांच्या साक्षीवर विश्वासू ठेऊ शकत नाही
– दोषिंना शिक्षा देण्या इतके पुरावे नाहीत
– घटनेच्या १०० दिवसानंतर साक्षीदारांनी साक्ष नोंदवली त्यामुळे आरोपी साक्षीदार कसे ओळखणार
– आरोपीकडे सापडलेले नकाशे, साहित्य यांचा या घटनेशी संबंधन नसल्याचे दिसते