banner 728x90

२२ सप्टेंबरपासून या वस्तूंवर आकारला जाणार नाही जीएसटी..बघा यादी

banner 468x60

Share This:

देशातील सर्वसामान्यांना दिलासा देत जीएसटी कौन्सिलच्या ५६व्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. २२ सप्टेंबर २०२५ पासून अनेक वस्तूंवरील जीएसटी दर कमी होणार असून यामुळे अन्नधान्य, औषधे, शिक्षण साहित्य, कृषी उपकरणे तसेच वाहनांपासून घरगुती वस्तूंपर्यंत हजारो उत्पादनांचे दर कमी होतील.

या निर्णयामुळे दैनंदिन वापरातील वस्तूंमध्ये पनीर, तूप, दूध, चपाती, सुकामेवा, बटर, चीज, चॉकलेट, बिस्किटे, लोणचे, रस, कॉफी यांसारख्या वस्तूंच्या किमतीत घट होणार आहे. पराठा, ब्रेड, खाखरा यांसारख्या पदार्थांवरील कर पूर्णपणे शून्य करण्यात आला आहे.

वैयक्तिक काळजीसाठी लागणारे टूथपेस्ट, टूथब्रश, साबण, शाम्पू, टॅल्कम पावडर, कंगवे यांसारख्या वस्तू आता फक्त ५% जीएसटीत मिळतील. शालेय विद्यार्थी आणि पालकांसाठीही आनंदाची बातमी आहे, कारण नोटबुक, खोडरबर, पेन्सिल, नकाशे, प्रयोगशाळेतील पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य आता करमुक्त होणार आहे. औषध क्षेत्रात कर्करोग आणि दुर्मिळ आजारांवरील औषधांवर जीएसटी पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे, तर इतर सर्व औषधे, थर्मामीटर, ऑक्सिजन सिलिंडर, निदान किट यांवर जीएसटी ५% करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर, त्याचे टायर-ट्यूब आणि भाग, सिंचन यंत्रणा, कापणी यंत्रे आणि मधमाशी पालन यंत्रांवर मोठा दिलासा देण्यात आला आहे. वाहनप्रेमींसाठी दुचाकी, लहान कार, GST will not be levied on these items ऑटो, प्रवासी बस तसेच इंजिनचे भाग यांवर करकपात होणार आहे. आधी २८% कर असलेली अनेक वाहने आता १८% दरात येणार आहेत. घर बांधणीसाठी लागणारे सिमेंट, संगमरवरी, ग्रॅनाइट ब्लॉक्स, विटा यांसारख्या बांधकाम साहित्याच्या किंमतीही कमी होणार आहेत.

ग्राहक इलेक्ट्रॉनिक्समध्ये टीव्ही, एसी, वॉशिंग मशीन, प्रोजेक्टर, डिशवॉशर यावर २८% ऐवजी १८% जीएसटी लागेल. त्यामुळे घरगुती उपकरणे खरेदी करणाऱ्यांना थेट हजारो रुपयांची बचत होणार आहे. खेळणी, बोर्ड गेम्स, क्रीडा साहित्य तसेच हस्तकलेवरील जीएसटी ५% करण्यात आला आहे. त्यामुळे पारंपरिक कलावस्तू आणि ग्रामीण हस्तकलेला चालना मिळेल. एकूणच जीएसटी कौन्सिलच्या या निर्णयामुळे सामान्य ग्राहकांपासून शेतकरी, विद्यार्थी, रुग्ण आणि गृहिणींपर्यंत सर्वांना दिलासा मिळणार आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर हा दिलासा ग्राहकांच्या खिशाला नक्कीच दिलासा देणारा ठरणार आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!