Ranji Trophy 2022: भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा, रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) देशभरात आयोजित केली जात आहे. यामध्ये अनेक दिग्गज आणि युवा खेळाडू आपल्या कामगिरीने सर्वांची मने जिंकत आहेत आणि भारतीय संघात निवडीसाठी आपला दावा ठोकत आहेत. या स्पर्धेत, महाराष्ट्र आणि हैदराबाद (MAH vs HED) यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यात, अनुभवी क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) धडाकेबाज खेळी खेळताना 204 धावा केल्या. रहाणेने आपल्या द्विशतक खेळीत 26 चौकार आणि 3 षटकार मारले.
रहाणे बराच वेळ संघाबाहेर
अजिंक्य रहाणे एकेकाळी भारतीय कसोटी संघाचा महत्त्वाचा भाग मानला जात होता. पण 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 2-1 ने जिंकल्यापासून तो अतिशय खराब फॉर्मशी झुंजत होता. त्याच्या बॅटमधून धावा येत नव्हत्या. जानेवारीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत तो शेवटचा खेळला होता. या सामन्याच्या दोन्ही डावात त्याने एकूण 10 धावा केल्या. त्यानंतर त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. आता या खेळीमुळे त्याने फॉर्ममध्ये परतल्याचे दाखवून दिले आहे. यासह, या खेळीतून रहाणेवर आगामी आयपीएल 2023 च्या लिलावाकडेही लक्ष असेल.
यशस्वी जैस्वालचे शतक, महाराष्ट्र मजबूत स्थितीत
या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करताना 600 धावा केल्या असून संघाच्या केवळ 4 विकेट पडल्या आहेत. संघासाठी रहाणेची पहिली सलामीवीर यशस्वी जैस्वालनेही दमदार खेळी केली. त्याने 27 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 162 धावा करत हैदराबादच्या गोलंदाजांची अवस्था बिघडवली.




.jpg)













