Maharashtra Rain Update: राज्यात गेल्या 4-5 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. खासकरुन गेल्या दोन दिवसांमध्ये पावसाने कोकण आणि विदर्भाला झोडपून काढलं आहे. या पावसामुळे अनेक जिल्ह्यांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
कोकणासह विदर्भात अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. आजही राज्यात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये आज शाळा-कॉलेजला सुटी जाहीर करण्यात आली आहे. आज राज्याच्या कोणत्या भागात कसे हवामान असेल ते सविस्तर जाणून घेऊयात.
या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता
कोकणात आजही मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने आज रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच आज मुंबई, पुणे, सातारा, या जिल्ह्यांनाही IMD कडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर आज भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आज महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
आज मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातही पावसाची शक्यता
आज मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातही पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज बहुतेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मध्यम चे मुसळधार पावसाची शक्यता आहे, त्यामुळे या भागाला आज यलो अलर्ट देण्यात आला आहे.
या जिल्ह्यांमधील शाळांना सुटी जाहीर
आज राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे आज रायगड, गडचिरोली, नागपूर, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यांमधील शाळांना सुटी जाहीर केली आहे. मुसळधार पावसामुळे शाळेत जाताना त्रासाचा सामना करावा लागत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईकरांना किनारी भागात न जाण्याचं आवाहन
मुंबईत आज सकाळीच जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच गेल्या दोन दिवसांपासून शहरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मुंबई पोलीसांनी नागरिकांना काळजी घेण्यात आवाहन केले आहे. तसेच आज नरिमन पॉइंट आणि मरीन ड्राईव्ह या किनारी भागात न जाण्याच आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर जर कुणी अडचणीत असेल तर ताबडतोब 100 नंबरवर कॉल करण्याचं आवाहनही पोलीसांना केले आहे.