पालघर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. आश्रम शाळेतील एका १७ वर्षीय विद्यार्थिनीने स्वत:ला पेटवल्याची घटना घडलीय. जव्हारमध्ये ही घटना घडली आहे.
विशेष बाब म्हणजे राज्यपाल पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना ही घटना घडली आहे. या घटनेमुळे आश्रम शाळेतील इतर विद्यार्थ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली होती.
काय आहे प्रकरण?
पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात देहरे (किरमिरा) या आश्रम शाळेत ही घटना (Palghar News) घडलीय. तेथे एका १७ वर्षीय युवतीने स्वतःला पेटवून आत्महत्या करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या विद्यार्थिनीचं नाव पायल आहे. पायल देहरे आश्रम शाळेत इयत्ता अकरावीमध्ये शिकते. काल २३ जुलै रोजी दुपारी पायल जेवण झाल्यानंतर ती शाळेच्या तिसऱ्या मजल्यावर गेली होती. तिथे पायलने स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतले.
आत्महत्येमागील नेमके कारण ?
ही घटना समजल्यानंतर आश्रम शाळेतील शिक्षकांनी तिला जव्हार येथील उपजिल्हा रुग्णालयात आणलं (Ashram School Girl Burnt) होतं. परंतु ही विद्यार्थिनी ९० टक्के भाजली गेली होती. त्यामुळे तिचा रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. या आत्महत्येमागील नेमके कारण समजले नाहीये. परंतु, या घटनेमुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात खळबळ माजली आहे. महत्वाचे म्हणजे राज्यपाल पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना हा प्रकार घडलेला आहे.
आश्रम शाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्युमुळे तालुक्यात मोठं संतापाचं वातावरण (Ashram School Jawhar) आहे. रात्री ८ ते ९ च्या सुमारास ही घटना समोर आलीय. पोलीस या प्रकरणी अधिकचा तपास करत आहे. परंतु या युवतीने असं टोकाचं पाऊल का उचललं, हे अजून गुलदस्त्यातच आहे. आश्रम शाळेतील इतर विद्यार्थिनींमध्ये देखील गोंधळाचं वातावरण आहे.