banner 728x90

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन जनकल्याण सेवांसाठीसर्वात प्रभावशाली एनजीओ म्हणून सन्मानित

banner 468x60

Share This:

रायगड  : प्रसाद पारावे

सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य मार्गदर्शनाखाली कार्यरत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनला 11व्या सी.एस.आर.शिखर संमेलनात यू.बी.एस.फोरमकडून वर्षातील सर्वात प्रभावशाली एनजीओ (स्वयंसेवी संस्था) म्हणून सन्मानित करण्यात आले. विवांता हॉटेल, द्वारका, दिल्ली येथे 28 ऑगस्ट, 2024 रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

banner 325x300

फाउंडेशनच्या वतीने हा गौरवशाली सन्मान पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेलेले संत निरंकारी मंडळाचे सचिव परम आदरणीय श्री.जोगिंदर सुखीजा यांनी या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, की संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनला प्राप्त झालेले अशा स्वरूपाचे अनेक विशेष पुरस्कार हे फाउंडेशनमार्फत केल्या जाणाऱ्या विविध सामाजिक व धर्मादाय स्वरुपाच्या कार्यांची पावतीच असते जो सतगुरु माताजी व निरंकारी राजपिता जी यांच्या अमूल्य व प्रेरणादायी शिकवणूकीचाच सुपरिणाम होय. नि:संशयपणे आम्हा सर्वांसाठी हा गौरवपूर्ण क्षण आहे.

ते म्हणाले, की सन् 2010 मध्ये स्थापित संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन समाजाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या कल्याणकारी परियोजना कार्यान्वित करुन सकारात्मक भूमिका निभावत आहे. त्यामध्ये आरोग्याच्या क्षेत्रात अनेक धर्मादाय इस्पितळे, दवाखाने, फिजियोथेरेपी, दंत चिकित्सा, नेत्र चिकित्सा केंद्रे, डायग्नोस्टिक लॅब इत्यादि सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत ज्याचा लाभ आतापर्यंत लाखो लोकांनी प्राप्त केला आहे. याच सेवांमध्ये संत निरंकारी हेल्थ सिटी प्रोजेक्ट या महत्वपूर्ण प्रकल्पाच्या निर्मितीचे कार्य प्रगतिपथावर आहे जो मानवता व एकत्वाच्या सुंदर भावनांना समर्पित आहे.
शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यालये, कॉलेज व युवकांसाठी विविध प्रकारची प्रशिक्षण केंद्रे; जसे निरंकारी इन्स्टिट्यूट ऑफ म्यूझिक आणि आर्टस, मोफत शिक्षण केंद्रे, लायब्ररी इत्यादिंचा समावेश आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या सतत विकास लक्ष्य (Sustainable Development Goals) कार्यक्रमा अंतर्गत लक्ष्य क्र.06 नुसार सर्वांना पाणी व स्वच्छता बहाल करण्याच्या उद्देशाची पुर्ती करण्याच्या हेतूने फाउंडेशनकडून महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील सायवन आदिवासी भागात संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनमार्फल राबविण्यात येत असलेल्या जल संरक्षण परियोजने अंतर्गत तीन सीमेंट नाला बांध तयार करण्यात आले आहेत ज्याद्वारे या भागातील आदिवासींसाठी अनेक कार्ये सुरु करण्यात आली आहेत. त्यांचे सर्वात मोठे पाण्याचे दुभिक्ष्य दूर करण्यात आले आहे ज्याचा लाभ जवळपास 30 हजार स्थानिक आदिवासींना होत आहे.

प्रकृति संरक्षणार्थ एस.एन.सी.एफ. कडून अनेक परियोजना कार्यान्वित करण्यात येत आहे ज्यामध्ये जल रक्षणासाठी ‘प्रोजेक्ट अमृत’ तर पर्यावरण संतुलनासाठी ‘वननेस वन’ यासारख्या योजना राबविण्यात येत आहे ज्यायोगे पृथ्वीरक्षण होऊ शकेल. या कार्यक्रमामध्ये एस. एन. सी. एफ. च्या स्वयंसेवकांनी एका इंटरॅक्टिव डिस्प्लेच्या माध्यमातून संत निरंकारी मिशनकडून केली जाणारी विविध प्रभावशाली कार्ये प्रदर्शित करण्यात आली.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!