मुंबई (सलमान शेख )देशात कोरोनाचा शिरकाव झाला आणि संपूर्ण देशात ताळेबंदीची घोषणा करण्यात आली. त्यात अनेक गोर-गरिबांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. तर कित्येक जणांना कोरोना या भयावह विषाणूने ग्रासलय.
अनेकांना रुग्णालयात बेड, रेमडीसेवीर इंजेक्शन मिळत नव्हते. त्यासाठी रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना अक्षरशः कित्येक रुग्णालयांचे हेलपाटे मारावे लागत होते..
अशातच नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट महाराष्ट्राचे उपाध्यक्ष किरण भोगले यांनी हे पाहिलं आणि त्यांनी कोरोना रुग्णांना मदत करायचं ठरवलं. आणि मदतीचा हात दिलाय.
भोगले यांनी गरजूंना कोरोनावर संजीवनी ठरणाऱ्या रेमडीसेवीर, टॉसिलीझुमाब सारख्या औषधांची व्यवस्था करून दिलीये.. तसेच कोरोना या भयावह विषाणूपासून वाचण्यासाठी शिबीर घेऊन जनजागृती केली. आणि मास्क आणि सॅनिटाईझरचे वाटप केले.
कोरोना योद्धा असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या दारापर्यंत खाद्यान्न पाकिटं पोहचवली. तसेच जिल्हाधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांशी बोलून; दुर्गम गावाला रुग्णवाहिका आणून कोरोना लसीकरण केले. ज्येष्ठ नागरिकांना साथीच्या काळात भोगले यांनी मदत केलीये.. यांच्या या कार्याला लक्षवेधी न्युजकडून सलाम…