वाडा:संजय लांडगे
वाडा तालुक्यातील सापाने येथील रहिवासी सुप्रिया काळे यांची शुक्रवारी (दि.११) जून रोजी त्यांच्या राहत्या घरात घुसून अज्ञात चोरट्यांणी निर्घृण हत्या केली आहे. त्यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करण्या बाबतचे निवेदन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने वाडा पोलिसांना देण्यात आले आहे.
सापाने (खुर्द) येथील अंगणवाडी सेविका व वाडा पंचायत समितीच्या माजी सदस्या सुप्रिया काळे यांचा शुक्रवारी अज्ञात चोरट्यांणी घरात घुसून त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्यांना जीवे मारून अंगावरील दागिने घेऊन पसार झाले आहेत. या घटनेला तीन दिवस उलटून गेले तरी अजूनही त्या चोरट्यांचा अजूनही तपास लागला नाही.अशा नराधमांना लवकरात लवकर अटक होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी या साठी वाडा तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष मृणाल नडगे यांच्या वतीने वाडा पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे. या प्रसंगी पालघर जिल्हा युवक उपाध्यक्ष राहुल वेखंडे, बांधकाम सभापती तथा नगरसेविका वाडा नगरपंचायत सुचिता पाटील व इतर कार्यकर्ते उपस्थित होते