वेब टीम : पालघर
आज संपूर्ण राज्यामध्ये शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.अशाचप्रकारे पालघर जिल्हा क्षत्रिय मराठा परिवारातर्फे शिवराज्याभिषेक सोहळा बोईसर येथे आयोजित करण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत पण यावर्षीदेखील कारोनाच्या पार्श्वभूमीवर रायगडावर शिवभक्तांना जाता आले नाही ;छत्रपती शिवाजी महाराज मना-मनात आणि राज्याभिषेक घराघरात अशा पद्धतीचा आवाहन केल्यानंतर अनेकांनी घरातच शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला . त्याचप्रमाणे बोईसर येथील ज्ञानसागर शाळेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेऊन राज्याभिषेक सोहळ्याच्या या पार्श्वभूमीवर क्षत्रिय मराठा परिवाराने लोकांना आदर्श घालून दिला. या कार्यक्रमादरम्यान छत्रपतींच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले.
पालघर तालुक्यात विविध ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला, त्यातीलच पालघर तालुक्यातील बोईसर येथील क्षत्रिय मराठा परिवार यांच्या वतीने छत्रपतींची महती सांगून शिवराज्याभिषेक संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते योगेश बन यांचा सत्कार करण्यात आला , दरम्यान पालघर जिल्हा महिला प्रमुख उज्वला शिंदे ,वसई विरार दक्षता समिती प्रमुख चंद्रकांत केंजळे आदी मान्यवर उपस्थित होते.क्षत्रिय मराठा परिवारातर्फे वर्षभरात विविध कार्यक्रम राबवले जातात. त्याच पद्धतीने शिवराज्याभिषेक सोहळा देखील बोईसर येथे साजरा करण्यात आला.