banner 728x90

मोठी बातमी: आयुष्य संपवण्याची भाषा करणारे आमदार श्रीनिवास वनगा कालपासून बेपत्ता

banner 468x60

Share This:

मोठी बातमी: आयुष्य संपवण्याची भाषा करणारे आमदार श्रीनिवास वनगा कालपासून बेपत्ता, 12 तासांपासन फोन नॉटरिचेबल

Srinivas Vanaga Not Reacheble : पालघर : पालघरचे (Palghar) शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde Group) आमदार श्रीनिवास वनगा (Srinivas Vanaga) मागील बारा तासांपासून नॉट रिचेबल असल्याची माहिती मिळत आहे.

banner 325x300

काल (सोमवारी) संध्याकाळी घरातून अचानक निघून गेलेले वनगा अजूनही घरी परतले नाहीत. तब्बल 12 तासांपासून श्रीनिवास वनगा घरात नाहीत. त्यामुळे कुटुंबीय मोठ्या चिंतेत सापडले आहेत. वनगा यांचे दोन्ही फोन बंद असल्यानं कुटुंबीयांसह पोलीस प्रशासनाकडून वनगांचा शोध सुरू आहे.

शिंदेंवर नाराज वनगा ठाकरेंच्या आठवणीनं व्याकूळ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून पालघरमधून माजी खासदार राजेंद्र गावितांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या फुटीनंतर शिंदेंसोबत गेलेले श्रीनिवास वनगा यामुळे नाराज झाले आहेत. तिकीट नाकारल्यानं माध्यमांशी बोलताना श्रीनिवास वनगा यांचा अश्रूंचा बांध फुटला. कॅमेऱ्यासमोरच ते ढसाढसा रडू लागले. शिंदेंनी फसवणूक केल्याचा आरोप करताना भावूक झालेल्या वनगांनी उद्धव ठाकरेंवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. उद्धव ठाकरे आमच्यासाठी देव होते, अशी भावना वनगा यांनी व्यक्त केली आहे.

आत्महत्येचा विचार मनात येऊ लागलाय… असं म्हटल्यानंतर श्रीनिवास वनगा पुन्हा नॉटरिचेबल

शिंदेसमर्थक आमदार श्रीनिवास वनगा यांना पुन्हा उद्धव ठाकरेंची आठवण झाली. खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर, उद्धव ठाकरे यांनीच श्रीनिवास वनगा यांना आमदारकी दिली होती. पण दोन वर्षांपूर्वी झालेल्या बंडात आमदार वनगा यांनी शिंदेंना साथ दिली होती. पण त्याच शिंदेंनी आपल्या समर्थक आमदारांपैकी केवळ वनगा यांचंच तिकीट कापलं आहे. त्यामुळं श्रीनिवास वनगा मानसिक तणावाखाली असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच, याच तणावातून टोकाचं पाऊल उचलण्याचे विचारही त्यांच्या मनात येऊ लागल्याचं त्यांनी सांगितलं होतं. अशातच आता ते नॉट रिचेबल असल्यामुळे सर्वजण चिंतेत सापडले आहेत. त्यात वनगा यांचे दोन्ही फोन बंद आहेत. कुटुंबीयांसह पोलीस प्रशासनाकडून वनगांचा शोध सुरू आहे.

शिंदेंकडून विधानपरिषदेचं आश्वासन

पालघरमधून भाजपनं राजेंद्र गावितांना उमेदवारी देताच, एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या श्रीनिवास वनगांना अचानक उद्धव ठाकरेंची आठवण झाली. खासदार वडील चिंतामण वनगांच्या निधनानंतर, उद्धव ठाकरेंनीच श्रीनिवास वनगा यांना आमदारकी दिली होती. पण दोन वर्षांपूर्वी शिंदेंनी केलेल्या बंडावेळी, वानगांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. आपलं काहीतरी चांगलं होईल ही आशा त्यांना होती. पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ‘हातचं सोडून पळत्याच्या पाठीस लागणं’ या म्हणीचा प्रत्यय वनगांना आला आहे. थेट आमदारकीच्या स्पर्धेतूनच एकनाथ शिंदेंनी वगळल्यानं, श्रीनिवास वनगा डिप्रेशनमध्ये गेले आहेत. आमच्या प्रामाणिकपणाचं हेच का फळ? असा सवाल विचारणाऱ्या वनगांच्या मनात सध्या आत्महत्येचा विचार घोंघावू लागल्याचं त्यांनी स्वतः माध्यमांशी बोलताना सांगतिलं होतं. पण सध्या श्रीनिवास वनगा नॉटरिचेबल असून त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, त्यामुळे एकनाथ शिंदेंनी त्यांच्या पत्नीशी फोनवरुन संवाद साधत त्यांना विधानपरिषदेचं आश्वासन दिलं आहे.

ठाकरेंचे पदाधिकारी वनगांच्या भेटीला

श्रीनिवास वनगा माध्यमांसमोर ढसाढसा रडल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी वनगांच्या घरी पाठवल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वसई जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी सांगितलं. त्यावेळीही श्रीनिवास वनगा हे घरी नव्हते. त्यामुळे श्रीनिवास वनगा यांचा शोध सुरू आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!