banner 728x90

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रात कुठे-किती मतदान? टक्केवारी समोर

banner 468x60

Share This:

Maharashtra Assembly Election : महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून राज्यात मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यात संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा सज्ज आहे.

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ६.६१ टक्के मतदान झाले आहे. तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात पहिल्या टप्प्यात कुठे किती मतदान झाले, याची आकडेवारीही समोर आली आहे.

banner 325x300

मुंबईत किती टक्के मतदान?

मुंबई शहरात सकाळी ९ वाजेपर्यंत 6.25 टक्के मतदान झाले आहे. यात सर्वाधिक ८.३१ टक्के मतदान हे मलबार हिल मतदारसंघात झाले आहे. तर धारावी मतदारसंघात सर्वात कमी ४.७१ टक्के मतदान झाले आहे. धारावीत 4.71 टक्के, सायन-कोळीवाडा: 6.52 टक्के, वडाळा 6.44 टक्के, माहीम: 8.14 टक्के, वरळी: 3.78 टक्के, शिवडी : ६.१२ टक्के, भायखळा: 7.09 टक्के, मलबार हिल: 8.31 टक्के, मुंबादेवी 6.34 टक्के आणि कुलाबा: 5.35 टक्के मतदान झाले आहे.

पुण्यात किती टक्के मतदान?

मुंबईपाठोपाठ पुणे जिल्ह्यात सकाळी ९ पर्यंत 5.53 टक्के मतदान झाले आहे. पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघातील सकाळी 9 वाजेपर्यंत मतदान टक्केवारी समोर आली आहे. यात कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ 7.44%. मतदान झाले आहे. तर पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ 5.53% मतदान, हडपसर विधानसभा मतदारसंघ 4.45 टक्के मतदान, पर्वती विधानसभा मतदारसंघ 6.30% मतदान, खडकवासला विधानसभा मतदारसंघ 5.44% मतदान, कोथरूड विधानसभा मतदारसंघ 6.50% मतदान, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ 5.29% मतदान, वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ 6.37% मतदान झाले आहे.

पालघरमधील मतदानाची टक्केवारी समोर

पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रात आतापर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी समोर आली आहे. यात पालघर विधानसभा मतदान केंद्रात 5.94 टक्के, बोईसर विधानसभा 6.97 टक्के, डहाणू विधानसभा 8.5 टक्के, विक्रमगड विधानसभा 6.4 टक्के, नालासोपारा विधानसभा 7.48 टक्के, वसई विधानसभा 8.32 टक्के मतदान झाले आहे.

तर सातारा जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत 5.14 टक्के मतदान झाले आहे. यात फलटण 4.29 टक्के, वाई 4.92 टक्के, कोरेगाव 6.93 टक्के, माण 3.08 टक्के, कराड उत्तर 4.84 टक्के, कराड दक्षिण 5.63 टक्के, पाटण 4.68 टक्के, सातारा – 6.15 टक्के मतदान झाले आहे.

यवतमाळ आणि बीडमधील मतदान किती टक्के?

यवतमाळ जिल्ह्यातील सकाळी ९ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी समोर आली आहे. यात आर्णी 8.34 टक्के, दिग्रस- 6.57 टक्के, पुसद- 6.42 टक्के, राळेगाव- 7.32 टक्के, उमरखेड- 5.60 टक्के, वणी- 9.00 टक्के, यवतमाळ- 7.20 टक्के मतदान झाले आहे. त्यासोबतच बीडमधील सहा विधानसभा मतदारसंघातील टक्केवारी समोर आली आहे. यात बीड जिल्ह्यात सकाळी 9 वाजेपर्यंत 8.66 टक्के मतदान झाले आहे. यात आष्टी – 8.66 टक्के, बीड – 7.15 टक्के, गेवराई – 6.90 टक्के, केज – 5.81 टक्के, माजलगाव – 5.60 टक्के, परळी 7.08 टक्के मतदान झाले आहे.

रत्नागिरीत ८.९६ टक्के मतदान

तसेच नाशिकमधील नाशिक पूर्व या मतदारसंघात 6.43 टक्के, नाशिक मध्य 7.55 टक्के, नाशिक पश्चिम 6.25 टक्के आणि देवळालीमध्ये 4.42 टक्के मतदान पार पडले आहे. यासोबतच रत्नागिरीत जिल्ह्यात सकाळी ७ पासून ९ वाजेपर्यंत ८.९६ टक्के मतदान पार पडले आहे. यातील दापोली मतदारसंघात 8.54 टक्के, गुहागर 9.16 टक्के, चिपळूण 10.14 टक्के, रत्नागिरी – 9.07 टक्के, राजापूर – 8.89 टक्के मतदान झाले आहे.

सोलापुरात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 5.16 टक्के मतदान पार पडले आहे.

  • सोलापूर शहर मध्य – 5.55%
  • करमाळा विधानसभा – 4.87%
  • माढा विधानसभा – 4.74 %
  • बार्शी विधानसभा – 5.26 %
  • मोहोळ विधानसभा – 4.99 %
  • सोलापूर शहर उत्तर विधानसभा – 5.93 %
  • अक्कलकोट विधानसभा – 6.14 %
  • सोलापूर शहर दक्षिण – 5.66 %
  • पंढरपूर विधानसभा – 3.23 %
  • सांगोला विधानसभा – 5.60 %
  • माळशिरस विधानसभा – 4.85 %

धाराशिव मतदारसंघात आतापर्यंत ४.८५ टक्के मतदान झाले आहे.

  • उस्मानाबाद विधानसभा – 3.97 %
  • परंडा – 5.10 %
  • तुळजापूर – 5.73 %
  • उमरगा – 4.56 %

जालना जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी

  • परतूर विधानसभा मतदारसंघ – 6.22 टक्के
  • घनसावंगी विधानसभा मतदारसंघ 7.6 टक्के
  • जालना विधानसभा मतदारसंघ 7.7 टक्के
  • बदनापुर विधानसभा मतदारसंघ (एससी राखीव) – 8.2 टक्के
  • भोकरदन विधानसभा मतदारसंघ – सकाळी 9 वाजेपर्यंत – 8.25 टक्के

सांगलीतील मतदानाची टक्केवारी

  • मिरज – 6.32
  • सांगली – 7.6
  • इस्लामपूर – 8.13
  • शिराळा – 6.19
  • पलूस – कडेगाव – 4.77
  • खानापूर – 4.71
  • तासगाव कवठेमहांकाळ – 6.37
  • जत – 4.94

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!