मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून राज्यात सुरू असलेली विधानसभेची रणधुमाळी यातून निर्माण झालेले विविध आरोप प्रत्यारोप, बाचाबाची तसेच शाब्दिक चकमक यानंतर आज उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीन मध्ये बंद झाला आहे.
राज्यातील 288 मतदार संघातील उमेदवारांसाठी मतदान पार पडलं. याचा निकाल आता 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. मात्र त्याआधी मत मतदारांचा कौल कोणाला ? याचा अंदाज व्यक्त करणार आहे एक्झिट पोल जाहीर झाला आहे. जाहीर केलेल्या एक्झिट पोल नुसार राज्यात कुणाचा सरकार येईल याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पी मार्क आणि मनी कंट्रोलच्या पोलनुसार महायुतीला १३७ ते १५७ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर महाविकास आघाडीला १२६ ते १४६ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर इतर पक्षांना, अपक्षांना २ ते ८ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पिपल्स पल्सचा अंदाज हे सांगतो आहे की महायुतीला १७५ ते १९५ जागा मिळतील. तर महाविकास आघाडीला ८५ ते ११२ जागा मिळतील असा अंदाज आहे. या पोलनुसार भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरेल आणि ११३ जागा भाजपाला मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ५२ जागा मिळतील हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला १७ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काँग्रेसला ३५, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला २७ जागा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ३५ जागा मिळतील, इतर आणि अपक्षांना ६ ते १२ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
चाणक्य स्ट्रॅटेजीचा एक्झिट पोल समोर आला आहे. महायुतीला १५२ ते १६० जागा मिळतील असं हा पोल सांगतो आहे. तर महाविकास आघाडीला १३० ते १३८ जागा मिळतील असं हा पोल सांगतो आहे. तर इतर सहा ते आठ जागा इतर आणि अपक्षांना मिळतील असा अंदाज वर्तवला गेला आहे.
मेघ अपडेट्सच्या एक्झिट पोलनुसार भाजपा महायुतीला १५० ते १७० जागा निवडणूक निकालात मिळतील तर काँग्रेससह महाविकास आघाडीला ११० ते १३० जागांपर्यंत मजल मारता येईल. तसंच अपक्ष आणि इतरांना ८ ते १० जागा मिळतील. असा अंदाज आहे.
महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक संपली आहे. आता पोल डायरीने जो अंदाज वर्तवला आहे त्यानुसार महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येईल. १२२ ते १८६ जागा महायुती जिंकेल असा विश्वास पोल डायरीने वर्तवला आहे. महाविकास आघाडीला १२१ जागा मिळतील असा त्यांचा अंदाज आहे.