banner 728x90

ईव्हीएम हॅकवरून गदारोळ सुरू असतानाच आता मतदान केंद्रावरील पोलीस निलंबित, असं घडलं तरी काय ?

banner 468x60

Share This:

ईव्हीएमच्या मुद्यावरून सध्या मविआ नेत्यांनी आवाज उठवल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच अमेरिकेतील हॅकर सैयद शुजा याने अमेरिकेतील संरक्षण विभागाचे तंत्रज्ञान वापरुन ईव्हीएम हॅक करता येत असल्याचा दावा केला होता.

यामुळे नवीन गदारोळ माजला, मात्र (देशात) निवडणूक आयोगाने हे सर्व दावे फेटाळत आरोप खोटे असल्याचा दावा केला होता. तसेच या व्हिडिओतील व्यक्तीविरुद्ध मुंबई सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचेही निवडणूक आयोगने स्पष्ट केले. या मुद्यावरून सध्या सर्वत्र चर्चा सुरू असतानाचा आत

banner 325x300

मतदानानंतर मतपत्रिकेचा फोटो काढणारा पोलीस निलंबित आता मतदान केंद्रावरील एका पोलिसावक कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून त्याला निलंबित करण्यात आलं आहे. शिवडी पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या पोलीस हवालदाराला निलंबित करण्यात आले आहे. रियाझ पठाण असे निलंबित हलावदाराचे नाव असून त्याच्या पोस्टल बॅलेट पेपरचा फोटो शेअर केल्यानंतर निवडणूक गोपनीयतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. तसेच त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रियाज पठाण ( वय 40) हे शिवडी पोलीस ठाण्यात तैनात होते. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या सुविधा केंद्रात त्यांनी मतदान केलं. मात्र त्यानंतर त्यांनी आपल्या चिन्हांकित मतपत्रिकेचा फोटो काढून साताऱ्यातील मित्राला पाठवला. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि एकच गदारोळ माजला. त्यानंतर याप्रकरणी कडक कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट करत चौकशीला सुरुवात झाली.

त्या अंतर्गत केलेल्या चौकशीअंती पोलिसांनी जेजे मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पठाण यांची चौकशी होईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे.

ईव्हीएम हॅकचा दावा करणाऱ्या हॅकरवर आयोगाकडून गुन्हा दाखल

निवडणूक आयोगाच्या तक्रारीवरून मुंबईच्या सायबर पोलिसांनी हॅकर सय्यद सुजाविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. व्हिडीओ कॉलिंगवर दोन व्यक्ती कथित हॅकरशी ईव्हीएम हॅकिंगबाबत चर्चा करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओबाबत निवडणूक आयोगाने मुंबईतील दक्षिण सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. तसेच सोशल मीडियात स्पष्टीकरण देऊन ईव्हीएम हॅकिंगच्या दाव्याचे खंडन केले आहे . मात्र विरोधक टीका करीत असतानाच व्हिडीओ समोर आल्याने निवडणूक आयोग अडचणीत सापडलं आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!