मुंबई – तो दक्षिणेतील सुपरस्टार आहे. त्याची देवासारखी पूजा केली जाते. त्याचा कुठलाही चित्रपट प्रदर्शित होणार असल्यास थिएटरच्या बाहेरचा माहोल पाहण्यासारखा असतो. तुम्ही ओळखलं असेलच तो आहे रजनीकांत. यन्ना रास्कल, माइंट इट… असे डायलॉग ज्याच्या ओठावर असतात तो रजनीकांत. आपला आहे. म्हणजे महाराष्ट्राचा. बघा त्याची इस्टोरी….
1. भारतीय सिनेमा जगतात सर्वात प्रभावशाली अभिनेत्यांमध्ये रजनीकांतचा क्रमांक वरचा आहे. त्याचा फॅन फॉलोअर्सही प्रचंड मोठा आहे. देवासारखा मान त्याला दक्षिणेकडील राज्यांमध्ये दिला जातो. रजनीकांत यांना भारतीय चित्रपट क्षेत्राला दिलेल्या योगदानाबद्दल पदमश्री पुरस्कारानं सन्मानीत करण्यात आले आहे.
2. केवळ अभिनय नाही तर निर्माता, दिग्दर्शन, लेखन यासारख्या भूमिकेतही त्यांनी मोठी कामगिरी केली आहे. त्यांनी काही चित्रपटांसाठी गायनही केलं आहे. कर्नाटकातल्या गायकवाड नावाच्या एका मराठी कुटूंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचं गाव नचिकु्प्पम हे आहे. जे कृष्णागिरी या जिल्हयात येते.
3. रजनीकांत यांच्या वडिलांचे नाव रामोजीराव असे होते तर आईचे नाव जिजाबाई. त्यांचे वडिल पोलीस सेवेत कामाला होते. वयाच्या आठव्या वर्षी त्यांना मातृशोक झाला. त्यांचे शालेय शिक्षण बंगलोर येथील आचार्य पाठशाळा येथे झाले. त्यांनी विवेकानंत बालक संघ याठिकाणीही शिक्षण घेतले.
4. वाय.जी. महेंद्रन यांच्या बहिणीशी त्यांचा विवाह झाला. त्यांच्या पत्नीचे नाव लता पार्थसारथी. वयाच्या 31 व्या वर्षी तिरुपती येथे त्यांचे लग्न झाले. रजनीकांत यांना दोन मुली आहेत. ज्यांची नावे ऐश्वर्या आणि सौंदर्या अशी आहेत.
5. 1973 साली मद्रास येथील फिल्म संस्थेत ते जॉईन झाले होते. त्याकामी त्यांना राज बहादूर यांनी मदत केली होती. त्यावेळी त्यांनी अॅक्टिंगचा बेसिक कोर्सही केला होता.
6. रजनीकांत यांनी आतापर्यंत एकूण 190 चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यात तमिळ, कन्नड, तेलगु, मल्याळम, हिंदी, इंग्रजी काही बंगाली चित्रपटांचा समावेश आहे. त्यांनी अंधाकानून चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते.
7. त्यांनी मोजक्याच हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यातील श्रीदेवी बरोबरील चालबाज, उत्तर दक्षिण, गिराफ्तार, हम या चित्रपटांचा समावेश आहे. 1988 प्रदर्शित झालेल्या ब्लडस्टोन चित्रपटातून त्यांनी हॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते.
8. रजनीकांत यांचा पहिला चित्रपट हा तमिळ भाषेत प्रदर्शित झाला होता. त्यात त्यांना एक सहाय्यक कलावंतांची भूमिका मिळाली होती. त्यानंतर अपूर्वा हा 1975 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात त्यांना कर्करोग झालेल्या रुग्णाची भूमिका केली होती. त्याचे दिग्दर्शक के.बालचंदर होते.
9. बालचंदर हे रजनीकांत .यांचे गुरु असल्याचे म्हटले जाते. कथा संगमा हा त्यांचा पहिला कन्नड चित्रपटात भूमिका केली आहे. पुत्ताना कांगाल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
10. बालचंद यांनी ख-या अर्थानं रजनीकांत यांच्या भूमिकेला वेगवेगळे पैलू पाडण्याचे काम केले. रजनीकांत यांना ग्लॅमर मिळवून देण्यात त्यांचे योगदान महत्वाचे आहे. आज सर्वसामान्य प्रेक्षकांच्या मनावर रजनीकांत यांची जी प्रतिमा आहे त्यात बालचंदर यांचा वाटा मोलाचा आहे.