अक्कलकोट- एखाद्या धार्मिक स्थळी गेल्यानंतर जेवढ्या शांततेने देवाचे दर्शन होईल तितके मन प्रसन्न होते. आज सर्व धार्मिक स्थळांवर भविकांची मोठ्या संख्येने गर्दी होत असताना दिसून येत आहे. मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या नियोजनातून श्री स्वामी समर्थांचे मूळ स्थान असलेल्या येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री स्वामी समर्थांचे शांतचित्ताने मनोभावे दर्शन घेण्याचे भाग्य भाविकांना लाभत आहे याचा विशेष आनंद आहे. त्यामुळे येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान म्हणजे श्री स्वामी समर्थांचे मनोभावे दर्शन घेण्याचे महत्वाचे मुळस्थान असल्याचे मनोगत भारतीय जनता पार्टीचे जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला व राज्य मंत्रिमंडळ विस्तारीकरणात मंत्रीपद मिळणे बाबत शुभेच्छा व्यक्त केले. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, संजय पवार, विपुल जाधव, गिरीश पवार, अविनाश क्षीरसागर, श्रीकांत मलवे, सागर गोंडाळ इत्यादी उपस्थित होते.
Home
लक्षवेधी माहिती
"वटवृक्ष देवस्थान मनोभावे स्वामी दर्शन घेण्याचे स्थान - आ.गोपीचंद पडळकर" मंत्रिमंडळातील विस्तारी करणात पडळकर यांना मंत्री पदासाठी महेश इंगळेंनी दिल्या शुभेच्छा...
“वटवृक्ष देवस्थान मनोभावे स्वामी दर्शन घेण्याचे स्थान – आ.गोपीचंद पडळकर” मंत्रिमंडळातील विस्तारी करणात पडळकर यांना मंत्री पदासाठी महेश इंगळेंनी दिल्या शुभेच्छा…

Read Also
Recommendation for You

Post Views : 54 मुंबईत दाखल होण्यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालायाने जरांगेंसह करोडो मराठा समाजाला दणका…