banner 728x90

वनडेनंतर काेहली कसोटीत नंबर वन फलंदाज बनला; स्मिथ दुसऱ्या स्थानी

banner 468x60

Share This:

दुबई – भारताचा कर्णधार विराट कोहली कसोटी क्रमवारीत नंबर वन बनला. कोहली वनडेतदेखील पहिल्या क्रमांकावर आहे. कोहली एका वर्षापूर्वी डिसेंबर २०१८ मध्येदेखील दोन्ही प्रकारात अव्वल होता. पाकिस्तानविरुद्ध दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ केवळ ३९ धावा करू शकला आणि त्यामुळे त्याच्या क्रमवारीत आठ गुणांची घसरण झाली. कोहलीचे ९२८ आणि स्मिथचे ९२३ गुण आहेत. अव्वल दहा फलंदाजांत भारत आणि ऑस्ट्रेलियाचे प्रत्येकी ३-३ फलंदाज आहेत. चेतेश्वर पुजारा चौथ्या आणि अजिंक्य रहाणे सहाव्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नरने पाकविरुद्ध ३३५ धावांची खेळी केली. तो १२ स्थानांची झेप घेत पाचव्या स्थानी पोहोचला. यावर्षी सुरुवातीला तो ११० व्या स्थानावर होता. मार्नस लुबचानेने पहिल्यांदा अव्वल १० मध्ये प्रवेश केला. तो सातव्या स्थानी आहे. कसोटी गोलंदाजी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स ९०० गुणांसह अव्वलस्थानी आहे. बुमराह पाचव्या, अश्विन नवव्या आणि मो. शमी दहाव्या क्रमांकावर पोहोचले.
स्मिथला नंबर वनची पुन्हा संधी :
स्टीव्ह स्मिथ या महिन्यात पुन्हा नंबर बन फलंदाज बनू शकतो. ऑस्ट्रेलियामध्ये न्यूझीलंड १२ डिसेंबरपासून ३ लढतीची मालिका खेळेल. भारत आता फेब्रुवारी २०२० मध्ये कसोटी खेळणार आहे.
कसोटीत अव्वल ५ फलंदाज
खेळाडू देश गुण
विराट कोहली भारत 928
स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलिया 923
विलियम्सन न्यूझीलंंड 877
चेतेश्वर पुजारा भारत 791
डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलिया 764
कसोटीत अव्वल ५ गोलंदाज
खेळाडू देश गुण
पॅट कमिन्स ऑस्ट्रेलिया 900
कागिसो रबाडा द.आफ्रिका 839
जेसन होल्डर वेस्ट इंडीज 830
नील वेगनर न्यूझीलंंड 814
जसप्रीत बुमराह भारत 794

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!