banner 728x90

प्रत्येकवेळी टोल भरण्यापासून कायमची सुटका होणार? जाणून घ्या ‘लाइफटाइम टोल पास’साठी किती खर्च येईल

banner 468x60

Share This:

जर तुम्ही अनेकदा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. मध्यमवर्गीय कुटुंब आणि कार मालकांना सरकार लवकरच आणखी एक भेट देऊ शकते. सरकार वार्षिक टोल पास आणणार आहे.

या पाससाठी तुम्हाला फक्त 3,000 रुपये मोजावे लागतील. त्यानंतर तुम्ही वर्षभर राष्ट्रीय महामार्गांवर कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रवास करू शकाल. एवढेच नाही तर तुम्हाला आजीवन पासचा पर्यायही उपलब्ध असेल. यासाठी तुम्हाला एकावेळी 30,000 रुपये द्यावे लागतील आणि 15 वर्षे टोल न भरता तुम्ही राष्ट्रीय महामार्गांवर वाहन चालवू शकता.

banner 325x300

वृत्तानुसार, रस्ते वाहतूक मंत्रालय या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करत आहे. खाजगी कारसाठी प्रति किलोमीटर टोल दरात बदल करण्याचाही मंत्रालय विचार करत आहे. त्यामुळे महामार्ग वापरकर्त्यांना काहीसा दिलासा मिळू शकेल. तुम्हाला नवीन पास खरेदी करण्याची आवश्यकता नाही. हा पास तुमच्या FASTag मध्ये जोडला जाईल.

वार्षिक पासचा फायदा काय? –

सध्या फक्त मासिक पास उपलब्ध आहे. हा पास अशा लोकांसाठी आहे जे दररोज एकाच टोलनाक्यावरून जातात. या पाससाठी तुम्हाला तुमचा पत्ता आणि इतर काही माहिती द्यावी लागते. या पासची किंमत 340 रुपये प्रति महिना आहे. म्हणजे संपूर्ण वर्षाचा खर्च 4,080 रुपये आहे. मात्र असे सांगितले जात आहे की संपूर्ण राष्ट्रीय महामार्ग नेटवर्कवर एका वर्षाच्या प्रवासासाठी रु. 3,000 भरावे लागतील. हा ऐच्छिक पर्याय असेल.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच सांगितले होते की त्यांचे मंत्रालय कार मालकांना पास उपलब्ध करून देण्याच्या योजनेवर काम करत आहे.

काय फायदा होईल ?
आकडेवारीनुसार, 2023-24 मध्ये एकूण 55,000 कोटी रुपयांच्या टोल महसुलात खासगी कारचा वाटा केवळ 8,000 कोटी रुपये होता. टोल व्यवहार आणि संकलनाच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की 53% व्यवहार खाजगी कारसाठी झाले होते परंतु टोल वसुलीत त्यांचा वाटा फक्त 21% होता. शिवाय, सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत टोल प्लाझावर सुमारे 60% वाहतूक खाजगी वाहनांची असते तर व्यावसायिक वाहनांची ये-जा रात्रंदिवस समान असते.

सुरुवातीला NHAI ला काही महसुलाचे नुकसान सहन करावे लागेल. ही योजना सर्वसामान्यांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. विशेषत: जे लोक महामार्गावरून प्रवास करतात त्यांच्यासाठी जास्त फायद्याची असणार आहे. यामुळे वेळ तर वाचेलच शिवाय पुन्हा पुन्हा टोल भरण्याचा त्रासही दूर होईल. आता हे पाहणे महत्वाचे आहे की, ही योजना किती कधी लागू होईल आणि लोकांना त्याचा किती फायदा होईल.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!