Third Airport In Mumbai: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ शेवट्या टप्प्यात आहे. एप्रिलअखेर या विमानतळाहून व्यवसायिक उड्डाणे सुरू होणार आहेत. असे असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे.
मुंबईत होणार तिसरं विमानतळ होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र यांनी एका मुलाखतीत दिली आहे. त्यामुळे आता मुबंईकरांना विमान प्रवासासाठी तिसरा पर्याय उपलब्ध होणार आहे. तिसरं विमानतळ पालघरमध्ये तयार करणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईत तिसरे विमानतळ उभारण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली आहे. पंतप्रधानांनी त्याला मान्यता दिली आहे. त्यामुळे आता नागपूर आणि शिर्डी विमानतळांच्या विकासासह पालघरमध्येही विमानतळ उभारले जाणार आहे. फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, मी पंतप्रधानांना विनंती केली होती की, आपण पोर्ट उभारतो आहोत, तर विमानतळ देखील उभारले पाहिले. वसई, विरार, डहाणू हा परिसर वेगाने वाढतो आहे. त्यामुळे मुंबईला तिसऱ्या विमानतळाची गरज आहे. त्यामुळे वाढवण बंदरासोबत पालघर येथे विमानतळ उभारले जाणार आहे. तसेच बुलेट ट्रेनचा स्टॉपही तेथे होणार आहे. येथे मोठी इकोसिस्टिम तयार होईल, असेही ते म्हणाले.
देशाचा आणि राज्याचा कायापालट होणार…
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, पालघरला होणारे विमानतळ वाढवण बंदराशी जोडले जाईल. अखाती देश आणि युरोपकडून येणाऱ्या शीपसाठी डहाणूचा पोर्ट जवळ असेल. या बंदराची क्षमता जेएनपीटीपेक्षा जास्त आहे. वाढवण पोर्टमुळे देशाचा आणि राज्याचा कायापालट होणार आहे. याच पोर्टला जोडण्यासाठी पालघरमध्ये नवे विमानतळ उभारले जाईल असे फडणवीस यांनी सांगितले.
पालघरमध्ये मुंबईला तिसरे विमातळ मिळणार
दरम्यान वाढवण बंदराच्या पायाभरणीच्या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी पालघरमध्ये आले होते. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदींकडे पालघरमध्ये तिसरे विमानतळ बांधण्याची मागणी केली होती. ‘येत्या काळात मुंबई वाढणार आहे. आपण बंदराचं रिक्लेमेन्शन करणार आहोत. यासोबतच या ठिकाणी एअरपोर्टचेही रिक्लेमन्शन केले पाहिजे असे म्हणत फडणवीस यांनी पालघरमध्ये तिसरे विमानतळ झाले तर महाराष्ट्र अधिक पुढे जाईल, असे म्हटले होते. त्यानतंर आता त्यांनी तिसरे विमानतळ बांधले जाणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे मुंबई आणि नवी मुंबईनंतर आता पालघरमध्ये मुंबईला तिसरे विमातळ मिळणार आहे.