banner 728x90

तब्बल 12 लेन असलेला महाराष्ट्रातील पहिला आणि भारतातील एकमेव खाडी पूल

banner 468x60

Share This:

सायन पनवेल महाम्रगावरील वाशी खाडी पूल हा मुंबईला नवी मुंबई जोडणारा अत्यंत महत्वाचा दुवा आहे. मात्र, हाच ब्रीज महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंट प्रोजेक्टमधील माईलस्टोन ठरणार आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे येथे (MSRDC) नवीन पूल बांधला जात आहे. तब्बल 12 लेन असलेला महाराष्ट्रातील पहिला आणि भारतातील एकमेव खाडी पूल ठरणार आहे.

banner 325x300

वाशी खाडी पूल हा मुंबई आणि नवी मुंबई शहराला जोडणारा अत्यंत महत्वाचा दुवा आहे. मुंबईत यायचे असेल तर वाशी खाडीपुलाशिवाय पर्याय नाही. वाशी खाडीवर दोन पूल आधीपासून आहेत. पहिला पूल 1973 मध्ये बांधण्यात आला होता. हा दोन लेनचा ब्रीज आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव सुमारे दोन दशकांपासून हा पूल नियमित रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे. सध्या हा ब्रीजवर कधी कधी बॉलिवूड चित्रपटांचे शुटींग होते. तर, दुसरा पूल 1997 मध्ये बांधण्यात आला. हा सहा पदरी पूल सध्या वाहतुकीसाठी अपुरा पडत आहे. यामुळेच या ब्रीजवर नवीन पुल उभारण्यात येत आहे.

सध्या वाहतुकीसाठी उपलब्ध असलेल्या खाडी पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. विशेषत: टोल नाक्याजवळ मोठी वाहतूक कोंडी पहायला मिळते. मात्र, या खाडी पुलावर उभारण्यात येत असलेल्या नव्या तिसऱ्या पुलामुळे वाहतूक कोंडी फुटणार आहे.

खाडी पुलाच्या दोन्ही बाजूंना संमातर अशा प्रत्येकी तीन मार्गिकांचे आणखी दोन पूल एमएसआरडीसी उभारले जात आहेत. 1837 मीटर लांबीचे प्रत्येकी तीन मार्गिकांचे दोन पूल उभारण्यात येत आहे. म्हणजेच हा नवा पुल एकूण 12 लेनचा असणार आहे. हा पूल वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. सध्या टप्प्याटप्प्याने हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येत आहे. हा पूल पूर्ण क्षमेतेने सुरु झाल्यावर या मार्गावरुन प्रवाशांचा ट्रॅफिकमुक्त प्रवास होणार आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!