banner 728x90

Mumbai Local: लोकलमधील गर्दी कमी होणार, 238 नव्या गाड्या मिळणार; रेल्वेमंत्र्यांची घोषणा

banner 468x60

Share This:

लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांचा प्रवास आता आणखी सुसाट होणार आहे. मुंबईसाठी उच्च दर्जाच्या 238 लोकल गाड्या तयार करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

यामुळे लोकलची गर्दी कमी होण्यासही मदत होणार आहे. त्यामुळे लाखो मुंबईकरांना याचा फायदा होणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

banner 325x300

मुंबईसाठी 238 लोकल गाड्या तयार केल्या जाणार

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत मुंबई लोकलविषयी महत्वाची माहिती दिली आहे. ‘मुंबईसाठी उच्च दर्जाच्या 238 लोकल गाड्या तयार करण्यात येणार आहेत. याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी नव्या तंत्रज्ञानाच्या डब्यांविषयी चर्चा झाली आहे. तसेच मुंबईतील जुन्या गाड्या आणि डबे बदलण्यावर भर देण्यात येणार आहे’ अशी माहितीही वैष्णव यांनी दिली आहे. रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयाचा फायदा लाखो मुंबईकरांना होणार आहे.

कमी भाड्यात उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सेवेबद्दलही माहिती दिली आहे. ‘प्रवासाचा खर्च प्रति किलोमीटर 1.38 रुपये आहे, मात्र आम्ही प्रवाशांकडून फक्त 73 पैसे घेतो. म्हणजेच आम्ही 47 % अनुदान देतो. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये प्रवाशांना 57 हजार कोटींचे अनुदान दिले होते, ते 2023-24 मध्ये वाढून सुमारे 60 हजार कोटी झाले होते. आमचे ध्येय कमी भाड्यात सुरक्षित आणि उत्तम सेवा पुरवणे हे आहे’ अशी माहितीही वैष्णव यांनी दिली आहे.

रेल्वेची आर्थिक स्थिती मजबूत – अश्विनी वैष्णव

राज्यसभेत पुढे बोलताना अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेच्या आर्थिक परिस्थितीबाबत आणि आगामी योजनेबाबतही माहिती दिली आहे. अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, ‘भारतीय रेल्वे गरीब प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहे. आम्ही सामान्य डब्यांची संख्या एसी कोचच्या तुलनेत 2.5 पटींनी वाढवत आहोत. आम्ही 17 हजार नॉन-एसी कोच तयार करत आहोत. सध्या भारतीय रेल्वेची आर्थिक स्थिती मजबूत आहे, रेल्वे स्वतःच्या उत्पन्नातून सर्व खर्च करत आहे’.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!