महाराष्ट्रात रस्त्यांसाठी केंद्रीय रस्ते पायाभूत सुविधा निधी अंतर्गत १,९९४ कोटी रुपये किंमतीच्या १३० रस्ते प्रकल्पांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच नागपूर जिल्ह्यातील रामटेक गड मंदिरात (Ramtek fort temple) ६३५ मीटर लांबीच्या रोपवेच्या विकास, संचालन आणि देखभालीसाठी १५१.५० कोटी रुपयांच्या निधीसह मंजुरी देण्यात आली आहे.
केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांनी ही माहीती दिली.
नितीन गडकरी म्हणाले की, नव्या १३० रस्ते प्रकल्पांमुळे संपूर्ण राज्यात आणि विशेषतः ग्रामीण भागात दळणवळण आणि संपर्क वाढेल आणि विकास होण्यास मदत होईल. तसेच महाराष्ट्रातील रस्ते व पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळेल. तसेच नागपूर जिल्ह्यातील रामटेक गड मंदिरात ६३५ मीटर लांबीच्या रोपवेच्या विकास, संचालन आणि देखभालीसाठी १५१.५० कोटी रुपयांच्या निधीसह मंजुरी देण्यात आली आहे.
तसेच रामटेक हे महाराष्ट्रातील एक प्रमुख धार्मिक स्थळ (religious place) आहे, जिथे भगवान श्रीराम वनवासात असताना त्यांचे वास्तव्य राहिले आहे. दरवर्षी ८ लाख यात्रेकरू रामटेक गड मंदिराला भेट देतात आणि कार पार्किंगपासून १२० पायऱ्या किंवा टेकडीच्या तळापासून मंदिराच्या मागील बाजूस ७०० पायऱ्या चढून दोन वेगवेगळ्या मार्गांनी मंदिरात पोहोचू शकतात. सदर रोपवे प्रकल्प मोनोकेबल फिक्स्ड ग्रिप जिग बॅक तंत्रज्ञानाचा वापर करून उभारला जाईल, ज्यामध्ये दररोज ७२०० प्रवाशांना सेवा देण्याची क्षमता असेल. या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ सुमारे ३-४ मिनिटांपर्यंत कमी होईल. तसेच रोपवे प्रकल्प विकासामुळे परिसरातील आर्थिक आणि पर्यटनवाढीला चालना मिळेल, असेही नितीन गडकरी म्हणाले.