banner 728x90

1 मे पासून ATM मधून पैसे काढणे महागणार, बॅलेन्स चेक करण्यासाठीही मोजावे लागणार जास्त पैसे

banner 468x60

Share This:

एटीएमधून पैसे काढणे हे येत्या मे महिन्यापासून महागणार आहे. कारण ATM Withdrawal Charges वाढवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली आहे. इतकंच नाही तर एटीएमध्ये बॅलेन्स चेक करण्यासाठीही जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

ATM मधून पूर्वी पैसे काढण्यासाठी बँका 17 रुपये दर आकारले जायचे. आता 1 मे पासून 17 ऐवजी ग्राहकांना 19 रुपये मोजावे लागणार आहे. तसेच पूर्वी ATM मधून खात्यातील बॅलेन्स चेक करण्यासाठी 7 रुपये दर आकारले जात होते. पण आता 1 मे पासून यासाठी 9 रुपये आकारले जातील.

banner 325x300

असे असले तरी तुमचे डेबिट कार्ड आणि ATM त्याच बँकेचे असतील तर तुम्हाला महिन्याला तीन ट्रान्झेक्शन मोफत असतील. तसेच तुमचे डेबिट कार्ड आणि ज्या ATM मधून तुम्ही पैसे काढणार असाल तर मेट्रो शहरात तीन आणि नॉनमेट्रो शहरातील ATM मध्ये पाच ट्रान्झेक्शन मोफत असणार आहेत.

पैसे कसे वाचवावेत?
बॅलेन्स चेक करण्यासाठी तुम्हाला ATM ची गरज भासतेच असे नाही. तुम्ही कुठलेही UPI असलेले अ‍ॅप वापरत असाल जसे BHIM, Google Pay, Phone Pe सारख्या अ‍ॅपमधून तुम्ही मोफत बॅलेन्स चेक करू शकता. इतकंच नाही तर तुमच्या बँकेच्या अ‍ॅपमधूनही मोफत बॅलेन्स चेक करू शकता.
ATM Withdrawal Charges वाचवण्यासाठी तुम्ही ऑनलाईन व्यवहार करू शतकता. तसेच महिन्याभरासाठी लागणारी रक्कम तुम्ही एकदाच काढू शकता.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!