banner 728x90

पुणेकरांनो यावेळी तरी मतदान करा! १३ वर्षे मंत्री असूनही काही करता आले नाही, बांगड्या भरा- पवार

banner 468x60

Share This:

वेब टीम
अहमदनगर : विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आल्यानं आरोप-प्रत्यारोपांना धार चढली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सर्वाधिक आक्रमकपणे सत्ताधाऱ्यांवर हल्ले चढवत आहेत. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार व माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्यावर तोफ डागताना पवार यांनी आज त्यांना बांगड्या भरण्याचा सल्ला दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पवार यांनी आज श्रीगोंद्यात जाहीर सभा घेतली. त्यावेळी पवार यांनी पाचपुते यांना लक्ष्य केलं. ‘पाचपुते यांना मी रयत शिक्षण संस्थेत सदस्य केले. पण, पाचपुते रयत शिक्षण संस्थेत बसून राजकारण करायला लागले होते. पाचपुते हे बिनकामाचे मंत्री होते. राष्ट्रवादीने त्यांना वनमंत्री, आदिवासी मंत्री केले. १३ वर्षं मंत्रिपद दिले. इतकी वर्षे मंत्रिपद मिळूनही त्यांना काही करता आले नसेल तर त्यांनी बांगड्या घातल्या पाहिजेत,’ अशी जहरी टीका पवार यांनी केली. पाचपुतेंनी खासगी कारखाने काढून शेतकऱ्यांचे पैसे थकविले.
वर्षांनुवर्षे ऊस उत्पादकांचे, कामगारांचे पैसे थकविले. ऊस उत्पादकांचे पैसे न देता उमेदवार म्हणून ते लोकांपुढं जात आहेत. लोकांनी त्यांना धडा शिकवावा,’ असं आवाहनही शरद पवार यांनी केलं.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!