banner 728x90

SSC Result 2025: राज्याचा दहावीचा निकाल 94.10 टक्के, यंदा कोकण विभाग अव्वल, तर नागपूर विभाग तळाला; तर यंदाही पोरांपेक्षा पोरी सरस

banner 468x60

Share This:

Maharashtra Board 10th SSC Result 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला.

यंदा राज्याचा दहावीचा निकाल 94.10 टक्के लागला आहे. यंदाही कोकण विभाग अव्वल असून यंदा दहावीच्या निकालात नागपूर विभाग तळाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली असून उत्तीर्ण झालेल्यी मुलींची टक्केवारी 96.14 अशी आहे, तर मुलांची टक्केवारी 92.21 अशी आहे.

निकालाची विभागनिहाय टक्केवारी

पुणे : 94.81 टक्के
नागपूर : 90.78 टक्के
संभाजीनगर : 92.82 टक्के
मुंबई : 95.84 टक्के
कोल्हापूर : 96.78 टक्के
अमरावती : 92.95 टक्के
नाशिक : 93.04 टक्के
लातूर : 92.77 टक्के
कोकण : 99.82 टक्के

निकाल कुठे पाहाल?

https://results.digilocker.gov.in
https://sscresult.mahahsscboard.in
https://sscresult.mkcl.org
https://results.targetpublications.org

banner 325x300


निकालाची ठळक वैशिष्ट्ये

दहावीच्या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15,58,020 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15,46,579 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी 14,55,433 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 94.10 आहे.
या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण 28,512 खाजगी विद्याथ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 28,020 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी 22,518 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 80.36 आहे.
या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण 24,376 पुनर्परिक्षार्थी विद्याथ्यर्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 23,954 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी 9,448 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 39.44 आहे.
या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून नियमित, खाजगी व पुनर्परिक्षार्थी मिस एकूण 16,10,108 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15,98,553 विद्याधी परीक्षेश प्रविष्ट झाले असून त्यापैकी 14,87,399 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 93.04 आहे.
या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण 9,673 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 9,585 दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी 8,844 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतची टक्केवारी 92.27 आहे.


सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (98.82 %) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा (90.78%) आहे.
सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 96.14 असून मुलांच्या उत्तीर्णतची टक्केवारी 12.31 आहे. म्हणजेच मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा 3.83 ने जास्त आहे.
माध्यमिक शालान्त (इ. 10 वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2025 करता एकूण 62 विषयांची परीक्षा घेण्यात आली. त्यापैकी एकूण 24 विषयांचा निकाल 100 % टक्के लागला आहे.
राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 4,88,745 विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, 4,97,277 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 3,60,630 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, 1,08,781 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती

निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन सासा ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येणार असून यासाठी https://mahahsscboard.in या संकेतस्थळावर सर्व माहिती अटी शर्ती आणि सूचना देण्यात आलेल्या आहेत. या प्रक्रियेसाठीचे विहित शुल्क Debit Card/Credit Card/UPI/Net Banking याद्वारे ऑनलाईन पद्धतीनंच भरावयाची आहे.

गुणपडताळणीसाठी अर्ज करावयाची मुदत बुधवार 14/05/2025 ते बुधवार, 28/05/2025 पर्यंत विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील. गुणपडताळणीसाठी प्रति विषय 50/- रुपये इतके शुल्क ऑनलाईन पद्धतीने मंडळाकडे जमा करावे लागेल.

फेब्रुवारी-मार्च 2025 च्या परीक्षेतील विद्याथ्यांना उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती मागणीसाठी

1. ई-मेल‌द्वारे / संकेतस्थळावरुन

2. हस्तपोहोच

3. रजिस्टर पोस्टाने

यापैकी एका पर्यायाची निवड करता येईल आणि त्यांनी मागणी केलेल्या पद्धतीनं छायाप्रत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी संबंधित विभागीय मंडळाकडे बुधवार, 14/05/2025 ते बुधवार, 28/05/2025 पर्यंत विहित नमुन्यात उपरोक्त संकेतस्थळावरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहील. उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी प्रति विषय 400/- रुपये इतके शुल्क ऑनलाईन पद्धतीने मंडळाकडे जमा करावे लागेल.

उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन

फेब्रुवारी-मार्च 2025 च्या परीक्षेतील उत्तरपत्रिकांचं पुनर्मूल्यांकन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वात आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणं अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून त्यापुढील पाच कार्यालयीन कामाच्या दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात प्रती विषय 300/- रुपये प्रमाणे शुल्क ऑनलाईन पद्धतीनं भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्याथ्यर्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करणं आवश्यक राहील.

अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन

दहावीची निकाल लागल्यानंतर विद्यार्थी आणि पालक यांची अकरावीच्या प्रवेशासाठी अनेक कॉलेजच्या खेटी घालाव्या लागतात. विद्यार्थी आणि पालक यांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र बोर्डानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र बोर्डानं यंदा अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबची माहिती बोर्डानं एक प्रसिद्धीपत्रक जारी करून यापूर्वीच दिली आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!